
Locals protest against temporary fixes, demanding permanent repair solutions from authorities.
Sakal
-राजेंद्र बाईत
राजापूर : गेल्या काही वर्षामध्ये अणुस्कूरा घाट मार्गामध्ये पावसाळ्यामध्ये सातत्याने दरडी आणि माती कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. नागमोड्या वळण्यांच्या या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी उंचच्या डोंगर, उभ्या रषेतील दरडी, मोठमोठ्या दगडी ठिकठिकाणी कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. त्यामध्ये विशेषतः घाटमाथ्यावरील सुमारे तीन कि.मी.च्या परिसरातील दरडी अधिक धोकादायक स्थितीमध्ये आहेत. पावसाने थोडा जोर धरताच धोकादायक स्थितीमध्ये उभ्या असलेल्या दरडी, मोठमोठ्या दगडी घसरून रस्त्यामध्ये येतात. त्यातून, घाटमाथा आणि कोकण यांना जोडणारा अणुस्कूरा घाटमार्ग प्रवासाच्यादृष्टीने धोकादायक ठरत आहे.