

“Candidate reshuffle triggers unrest as alliance cracks appear in Sawantwadi municipal election.”
Sakal
सावंतवाडी: येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रचंड गडबड दिसून आली. शहरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करत साक्षी वंजारी यांच्या रुपाने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह एकूण १६ जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने शेवटच्या क्षणी काही इच्छुकांचे पत्ते कट करत नव्या आणि अनपेक्षित चेहऱ्यांना रिंगणात उतरवले. दुसरीकडे काही इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने बंडखोरीची संभावना निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही काही जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निर्माण झालेले हे चित्र पाहता यावेळची निवडणूक रंगतदार पाहायला मिळणार आहे.