कोकणात दहावी, बारावी पुरवणी परीक्षा सुरू; बारावी, दहावीसाठी प्रत्येकी दोन केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tenth  twelfth supplementary examination begins sindhudurg

दोन भरारी पथके तैनात; जिल्ह्यात २९३ विद्यार्थी प्रविष्ट; दक्षता समितीची बैठक

कोकणात दहावी, बारावी पुरवणी परीक्षा सुरू; बारावी, दहावीसाठी प्रत्येकी दोन केंद्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडणार आहेत. या परीक्षांना जिल्ह्यातील एकूण २९३ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. त्यापैकी १८० विद्यार्थी हे बारावीच्या परीक्षेस तर ११३ विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेस बसणार आहेत. या परीक्षांसाठी २ भरारी पथके तयार केली आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे एक आणि निरंतर शिक्षण शिक्षणाधिकारी यांचे एक अशी दोन भरारी पथके असणार आहेत.
 

या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सातत्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणचे डॉ. प्रकाश जाधव, निरंतर शिक्षणचे शिक्षणाधिकारी अनिल तिजारे, परिवहन महामंडळाचे श्री. गोसावी, पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित 
होते. 


परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर, थर्मल गन उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच एखाद्या विद्यार्थ्यास तापा सारखी लक्षणे असल्यास त्याची स्वतंत्र ब्लॉकमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. कोविडच्या पार्श्वभूमीवर एका ब्लॉकमध्ये १० ते १२ विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आहे. अत्यावश्‍यक गरजेसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आरोग्य यंत्रणेचे सहकार्य घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी दिल्या. तर परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये कलम १४४ लागू करण्याच्याही सूचना दिल्या. पेपरच्या कस्टडीसाठी हत्यारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महामडळाने गाड्यांचे नियोजन केले असून वेळेत गाड्या सोडण्यात येतील, असे महामंडळाच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले.

हेही वाचा- कोल्हापुरातील बिंदू चौक-बुरुज आणि‌ तटबंदी

बारावी, दहावीसाठी प्रत्येकी दोन केंद्र
बारावीच्या परीक्षांसाठी सावंतवाडी येथील खेमराज महाविद्यालय व कणकवली येथील एस. एम. महाविद्यालय असे दोन केंद्र आहेत. सावंतवाडी येथील केंद्रावर १०६ आणि कणकवली येथील केंद्रावर ७४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर १० वी च्या परीक्षांसाठी केळुसकर हायस्कूल, सावंतवाडी आणि एस. एम. हायस्कुल कणकवली अशी दोन केंद्र आहेत. सावंतवाडी येथील केंद्रावर दहावीच्या परीक्षेसाठी ७० आणि कणकवली येथील परीक्षा केंद्रावर ४३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top