रत्नागिरी : सोलगाव आदर्श शाळेने फुलवले टेरेस गार्डन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलगाव आदर्श शाळेने फुलवले टेरेस गार्डन

रत्नागिरी : सोलगाव आदर्श शाळेने फुलवले टेरेस गार्डन

राजापूर: शाळेच्या स्लॅबच्या इमारतीच्या मोकळ्या जागेचा खुबीने उपयोग करीत तालुक्यातील सोलगाव येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कारप्राप्त शाळा नं. २ ने आकर्षक ‘टेरेस गार्डन’ विकसित केले आहे. मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांच्या संकपल्पनेतून तयार करण्यात आलेल्या गार्डनमध्ये फुलझाडांसह औषधी वनस्पतींच्या झाडांची चाळीस कुंड्यांमध्ये लागवड केली आहे. वाढत्या हवेच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानामध्ये टेरेस्ट गार्डनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे ‘ऑक्सिजन पार्क’ही विकसित केले आहे.

(कै.) मधुकर विष्णू दाते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नारायण विष्णू दाते यांच्या सहकार्याने सोलगाव शाळेने टेरेस गार्डन निर्मिती केली आहे. त्याचे उद्घाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी गोपाळ सोडये यांच्या झाले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर, मुख्याध्यापक दीपक धामापूरकर, सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्‍वर मगदूम उपस्थित होते.

सोलगाव येथील शाळेत मुख्याध्यापक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले गेले आहेत. त्यामध्ये इमारतीच्या सोलगाव आदर्श शाळेने फुलवले टेरेस गार्डन मोकळ्या टेरेसचा खुबीने उपयोग करीत बगीचा फुलवण्यात आला. या बागेमधील कुंड्यांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांना रंगीबेरंगी फुले फुलली असून त्यातून टेरेससह प्रशालेचा परिसर खुलला. टेरेसवरील बागेमध्ये बसून तेथील वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी त्या ठिकाणी छत्रीही बसविण्यात आली आहे. प्रशालेच्या परिसरामध्ये शुद्ध हवा खेळती राहण्यासाठी ऑक्सिजन पार्क उपयुक्त ठरत आहे.

तुळस, ओवा, कडुलिंबाची लागवड

हवेच्या वाढत्या प्रदूषणाबाबत सर्वस्तरातून चिंता व्यक्त केली जात असताना सोलगाव जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनमध्ये ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले आहे. या पार्कमध्ये हवेमध्ये मोठ्याप्रमाणात ऑक्सिजन सोडणारी तुळस, ओवा, चहाची पत्ती, कडुलिंब आदी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांनी दिली. टेरेस गार्डनमधील झाडांना पाणी देणे आणि देखभाल करण्याची जबाबदारी पुष्पमाला नांगरेकर या सांभाळत आहेत.

Web Title: Tergaon Garden Flourished Ratnagiri Adarsh School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RatnagiriKokanschoolSakal
go to top