मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदार संघासाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात आली आहे. सुमारे एक हजार कोटींहून अधिकचा निधी लागणार आहे.
रत्नागिरी : मुंबई शहरानंतर रेल्वे, विमान, जल आणि रस्ते अशा चारही वाहतुकीच्या सुविधा असणारे रत्नागिरी हे कोकण किनारपट्टीवरील एकमेव शहर आहे. त्यामुळे ‘टेस्ला’सारखा (Tesla Company) आंतरराष्ट्रीय प्रकल्प आल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल आणि जिल्हा ऑटोमोबाईल हब होण्याच्यादृष्टीने वाटचाल करेल, असा विश्वास राजापूर-लांजाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत (Kiran Samant) यांनी व्यक्त केला.