Raigad TET Exam : टीईटीसाठी १००-१५० किमीचा जीवघेणा प्रवास; दक्षिण रायगडच्या शिक्षकांना पनवेलपुरतेच केंद्र, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे चिंतेचे वातावरण

टीईटीसाठी सर्व केंद्रे पनवेलमध्येच; १००-१५० किमीचा खडतर प्रवास, महामार्गावरील खड्डे व कोंडीमुळे दक्षिण रायगडच्या शिक्षकांची मानसिक-शारीरिक दमछाक
Teacher Eligibility Test

Teachers from South Raigad face inconvenience due to centralized TET exam centers in Panvel

sakal
Updated on

पाली : रायगड जिल्ह्यात रविवारी (ता. 28) आयोजित करण्यात आलेल्या टीईटी (TET) परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग सज्ज झाले असले, तरी या नियोजनामुळे दक्षिण रायगडमधील हजारो शिक्षकांना मात्र प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९ परीक्षा केंद्रे केवळ पनवेल तालुक्यातच ठेवण्यात आल्यामुळे दूरवरच्या तालुक्यांतील शिक्षकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था आणि त्यावरील वाहतूक कोंडी या प्रवासात मोठा अडसर ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com