
राजापूरः पश्चिम घाट परिसरासह कोकण किनारपट्टीच्या जंगलात आढळणाऱ्या गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी लावला आहे. तालुक्यातील अणसुरे येथील श्रीदेव गिरेश्वर मंदिराच्या बाजूला असणाऱ्या झाडीत ओलसर पालापाचोळ्यात ही प्रजाती आढळून आली. यासह संशोधकांना उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान (चिखली, चिपळूण-गुहागर रस्ता), केशरनाथ विष्णू मंदिर (शेडवई), रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यातही ही गोगलगाय आढळली आहे. या नव्या प्रजातीचे नामकरण ‘थिओबालडियस कोंकणेंसिस’ असे केले गेले आहे.