हद्दपार केलेला थाई मागूर कोण...?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

केंद्र शासनाच्या कृषिमंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने थाई मागूर बंदी आणली आहे...

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या कृषिमंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने थाई मागूर माशाच्या संवर्धनावर बंदी आणली आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने या संदर्भात अलीकडेच याचिका निकाली काढली. त्यामुळे जिल्ह्यातील थाई मागूर माशांचे संवर्धन करणाऱ्या मत्स्यसंवर्धकांनी थाई मागूर माशांचे संवर्धन त्वरित थांबवावे, असे आदेश दिले आहेत. 

सदर मासे पूर्णत: नष्ट करावेत. तपासणी पथकास थाई मागूर माशांचे संवर्धन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी कळविले आहे. न्यायालयाच्या या आदेशानुसार थाई मागूर माशांचे प्रजनन व मत्स्यपालनावर बंदी घालण्यात आली आहे. या माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा- ब्लू व्हेल मासा का मरण पावतो.... वाचा
 
स्थानिक माशांसाठी अत्यंत धोकादायक 

थाई मागूर हा गोड्यापाण्यातील विदेशी कॅटफिश मासा आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही तो वाढू शकतो. तो सर्वभक्षी आहे. त्यामुळे निसर्गात उपलब्ध इतर स्थानिक माशांसाठी तो अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलनावर व इतर स्थानिक माशांच्या प्रजातीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thai Magur Deportation In Ratnagiri Kokan Marathi News