

Thailand Ganesh Devotees At Pali Ballaleshwar Temple Gain Attention As Local Guide Connects With Them In Their Thai Language
esakal
पाली: अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही थायलंड येथील गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अनंत चतुर्दशीच्या सांगतेनंतर दरवर्षी मुंबईतील गणेशोत्सव अनुभवून पालीमध्ये येणाऱ्या या परदेशी भक्तांची बल्लाळेश्वर चरणी असलेली अथांग भक्ती संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.