नाटकाच्या आनंदापासून रसिक दूरच

राजापूर : दैनंदीन धावपळीच्या जीवनापासून मुक्ती मिळून आनंदीमय जीवन व्हावे, लोकांना करमणूकीचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने राजापूर नगर पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाची उभारणी केली आहे.
नाट्यगृह
नाट्यगृहsakal
Updated on

राजेंद्र बाईत

राजापूर : दैनंदीन धावपळीच्या जीवनापासून मुक्ती मिळून आनंदीमय जीवन व्हावे, लोकांना करमणूकीचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने राजापूर नगर पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाची उभारणी केली आहे. मात्र, लोकवस्तीपासून दूर असल्याने प्रेक्षकांकडून पाठ फिरविली जात आहे. तर, कमी आसनक्षमता असल्याने व्यवसायिक नाटकांचे आयोजन करण्यास नाट्यसंयोजकही नाखुश असतात. त्याचवेळी नाट्यगृहाच्या उभारणीमध्ये दुरदृष्टीसह व्यवसायिक नियोजन अभावाचाही फटका या नाट्यगृहाला बसताना दिसत आहे. एकंदरीत, विविध समस्यांच्या कात्रीमध्ये नगर पालिकेचे बहुद्देशीय नाट्यगृह अडकलेले असून राजापूरचा रसिक गेल्या कित्येक वर्षे नाटकाच्या निखळ आनंदाला मुकत आहे.

खुले रंगमंच झाले इतिहासजमा

राजापूर शहरामध्ये यापूर्वी कै. द. ज. सरदेशपांडे खुला रंगमंच आणि श्रीदेव धुतपापेश्‍वर नाट्यमंदीर असे दोन रंगमंच होते. या ठिकाणी होणार्‍या व्यवसायिक नाटकांचा आनंद लुटताना आवडत्या दिग्गज कलाकाराला जवळून बघण्याची अन् अनुभवण्याची संधी साधण्यासाठी शहरातूनच नव्हे तर, ग्रामीण भागातूनही त्याकाळात बैलगाडीने वा मिळेल त्या वाहनाने नाहीच जमले तर, शहर परिसरातील रसिक पायी चालत येवून नाटक पाहत असतं. मात्र, कालपरत्वे झालेल्या बदलावांमध्ये हे दोन्ही खुले रंगमंच इतिहासजमा झाले आहेत. (कै.) द.ज.सरदेशपांडे खुला रंगमंच या ठिकाणाचे पालिकेने पार्किंग झोन उभारला असून सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. श्री देव धूतपापेश्वर खुला रंगमंचही खाजगी पार्किंग झोन झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com