रत्नागिरी : ऑलिव्ह रिडलेचे अखेर आगमन; ६१ अंड्यांचे केले संवर्धन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

olive-ridley

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडलेचे अखेर आगमन; ६१ अंड्यांचे केले संवर्धन

राजापूर : अवकाळी पाऊस(heavy rain ), प्रतिकूल हवामान आदींमुळे ऑलिव्ह रिडले (Olive ridley)प्रजातीची कासवे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अंडी घालण्यासाठी तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर येणार का, याची साऱ्‍यांना उत्सुकता आता संपली आहे. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे समुद्र किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आगमन झाले असून, वेत्ये येथे कासवाची रविवारी (ता. २) तब्बल ६१ अंडी सापडली आहेत. कासवमित्र गोकुळ जाधव यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्‍यावर घरटे करून योग्यपद्धतीने संवर्धन केले आहे. कासवांनी नववर्षाच्या शुभारंभाला दिलेल्या या सुखद धक्क्याने पर्यावरणप्रेमींसह वेत्येवासीय आणि पर्यटक(tourist) सारेच सुखावले आहेत. (The final arrival of Olive Ridley; Cultivation of 61 eggs)

वेत्ये किनाऱ्‍यावर कासवाच्या अंड्याचे संवर्धन करणारे यावर्षीचे पहिले घरटे झाले आहे. या अंड्यामधून आता सुमारे पंचावन्न दिवसांनी पिल्ले बाहेर येणार आहेत. प्रतिकूल हवामानामुळे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे आगमन लांबले. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कासवांनी किनारपट्टीवर येवून साऱ्‍यांना सुखद धक्का दिला आहे. वेत्ये समुद्र किनारी पहाटेच्या दरम्यान फेरफटका मारत असताना कासवमित्र जाधव यांना कासवांची अंडी आढळून आली. त्यांनी याबाबत तत्काळ राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. त्यानंतर किनाऱ्‍यावरील वन्यप्राणी वा जंगली श्‍वापदापासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन केले.

हेही वाचा: चिपळूण बचाव समितीने उपोषण थांबवावे ; प्रशासनाची कोअर कमिटीला विनंती

अशी केली जाते, जागेची निवड

ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या प्रजातीची मादी अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारपट्टीची निवड करते. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम आहे. या कालावधीमध्ये मादी कासव वालुकामय भागात हायटाईड लेव्हलपासून सुमारे ५० ते १०० मीटर अंतरावर १ ते १५ फूट उंचीचा खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालते. सर्वसाधारणपणे शंभर ते दोनशे इतकी त्यांची संख्या असते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top