भर वस्तीत फिल्मी स्टाइलने एटीएम फोडण्याचा केला प्रयत्न ; मात्र कॅशच आली नाही

राजेश शेळके
Friday, 16 October 2020

ज्यांनी  हे कृत्य केले, त्याच्या हालचाली सीसी टिव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.

रत्नागिरी : शहरातील मच्छीमार्केट येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने चोरट्यांना एटीएम फोडण्यात अपयश आल्याने कॅश गेली नाही. मात्र एटीएमचे बरेच नुकसान झाले आहे. मात्र तेथे सीसीटीव्ही असल्याने चोरट्यांचे हे कृत्य सीसी टिव्हीमध्ये कैद झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या गुन्ह्याची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - गव्यांच्या कळपाने घेरल्यावरही तो डगमगला नाही ; सिंधुदुर्गातील स्पेशल चाइल्डची संघर्षमय कहाणी -

लॉकडाउनमुळे गेली सहा ते सात महिने इतर सर्व गुन्ह्यांबरोबर चोर्‍यांवरही मोठ्या प्रमाणात अंकुश बसला होता. गुन्हेगारी कमी झाल्याने पोलिसांनाही काहीसी उसंत मिळाली होती. मात्र आता हळूहळू अनलॉक 5 च्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने सर्व काही पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाहतूक सुरू झाली आहे. जिल्हा बंदी उठल्याने आणि लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आल्याने भविष्यात चोर्‍यांचे प्रमाण वाढणार असल्याची चिन्हे आहेत. शहरातही चोरटयांनी डोके वर काढले आहे. काल रात्री भर वस्तीतील एटीएम फोडुन  रोकड लांबविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यांना एटीएम मशिन फोडुन कॅश काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात अपयश आले. त्यामुळे फक्त फोडण्याचा प्रयत्न झाला. 

शहरातील धनजी नाका ते  मच्छीमार्केट रोडवर आयसीआयसीआय बँकेचे हे एटीएम आहे. अज्ञात चोरट्यांनी फोडण्याची घटना रात्री घडली. ही बाब परिसरातील स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू झाला आहे. ज्यांनी  हे कृत्य केले, त्याच्या हालचाली सीसी टिव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. लवकरच ते सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

हेही वाचा - नारायण राणे नावाचा दबदबा कायम ; सत्ता असो की नसो -

ठसे तज्ज्ञांची टिमही पोलिसांनी बोलावली आहे. त्यामुळे त्या ठशांशी पोलिस रेकॉर्डला असलेल्या काही सराईत गुन्हेगारांशी काही संबंध आहे की अन्य कोणी आहे, याचा पोलिसांना अंदाज येणार आहे. शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम घटनास्थळी दाखल असून सीसीटिव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of ATM in ratnagiri in market area this try not fulfill by thepher in ratnagiri