चिपळूणात कॅनोन शोरूमध्ये चोरी ; शटर उघडून चोरट्यांनी मारला डल्ला

मुझफ्फर खान
Sunday, 26 July 2020

मुंबई - गोवा महामार्गालगत डीबीजे महाविद्यालयाच्या शेजारी कॅनोन कॅमेर्‍याचे शोरूम आहे.

चिपळूण - पोलिस आणि प्रशासन यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत असताना चोरट्यानी कॅनोन या कॅमेर्‍याच्या शोरूमवर डल्ला मारला. येथून सुमारे 3 लाखाचा एैवज चोरीला गेला आहे. शोरूमचे मालक अरूण कदम यांनी आज यासंदर्भात चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिला. 

मुंबई - गोवा महामार्गालगत डीबीजे महाविद्यालयाच्या शेजारी कॅनोन कॅमेर्‍याचे शोरूम आहे. शोरूमचे मालक अरूण कदम शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत शोमरूममध्ये होते. त्यानंतर शोरूमचे शटर बंद करून ते घरी निघून गेले. सकाळी 7 वाजता शेजारी लोकाना त्यांच्या शोरूमचे मागील बाजूचे शटर अर्धवट उघडलेले आढळून आले.

वाचा - ना दार, ना भिंती... कोकणातील 'या' मंदिराची हीच आहे ख्याती...

नागरिकांनी मोबाईलवरून कदम यांच्याशी चौकशी केली असता ते घरी असल्याचे आढळून आले. त्यानंतर स्वतः कदम शोरूममध्ये आले त्यांनी शटर पूर्णपणे उघडले असता शोरूममध्ये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. शोरूममध्ये 25 हजार रुपये होते. चोरट्यानी शटरचा लॉक फोडून आत प्रवेश केला आणि 25 हजार रोख रक्कमेसह महागडे कॅमेरा, लेन्स, मेमरी कार्ड असा एकूण सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. कदम यांनी यासंदर्भात चिपळूण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर चिपळूणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सांयकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

संपादन - मतीन शेख

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at the Canon showroom in Chiplun