'वंस तुमचे दागिने द्या, फोटो काढायचा आहे' म्हणत, नंदेकडून घेतलेले दागिने भावजयने पळविले

theft form two leady in family one leady theft jewellery from other in chiplun ratnagiri
theft form two leady in family one leady theft jewellery from other in chiplun ratnagiri

चिपळूण (रत्नागिरी) : फोटो काढण्याच्या निमित्ताने कोंडमळा येथील एका महिलेने आपल्याच नणंदेकडून दागिने घेतले ते परत केलेच नाहीत. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे तसेच २५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

सावर्डे पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडमळा येथील श्‍वेता चंद्रशेखर घाणेकर (वय ३६, कोंडमळा, गंगेचीवाडी) हिने सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घाणेकर यांच्या वहिनी दर्शना दशरथ जड्याळ यांनी बॅंकेत फोटो द्यायचे आहेत. फोटो काढण्यासाठी दागिने दे, अशी मागणी घाणेकर हिच्याकडे केली. घाणेकर यांनी जड्याळ यांना १८ डिसेंबर २०२० ला दागिने दिले. फोटो काढल्यानंतरही दर्शना यांनी ते परत दिले नाहीत.

दर्शना जड्याळ या कोंडमळा येथून नजरेआड गेल्या. संपर्क करूनही त्या भेटत नसल्यामुळे अखेर श्‍वेता घाणेकर यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घाणेकर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा नोंदवून यांचा शोध घेतला. जड्याळ यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासल्यानंतर त्या खेड, पनवेल, ठाणे, पाटण येथे ठिकाण बदलत राहत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी पाटण येथे सापळा रचून तिला अटक केली. या दरम्यान दर्शना दशरथ जड्याळ आणि संजय पांडुरंग सावर्डेकर (वय ४०, नांदगाव चिपळूण) यांचे मोबाईलवरील संभाषण तपासण्यात आले. त्यामध्ये सावर्डेकर यांनी एका खासगी बॅंकेत घाणेकर यांचे मंगळसूत्र गहाण ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी सावर्डेकर यांनाही अटक केली आहे. घाणेकर यांनी १२ वर्षापूर्वी ६२ हजार ५०० रुपये किमतीत २५ ग्रॅमचे मंगळसूत्र बनविले होते. पोलिसांनी तेही हस्तगत केले असून दोघांना अटक केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com