...तोपर्यंत वर्तमानपत्राचे अस्तित्त्व अबाधित : सुनील तटकरे

...तोपर्यंत वर्तमानपत्राचे अस्तित्त्व अबाधित : सुनील तटकरे

रोहा (जिल्हा रायगड) : वाहिन्यांच्या स्पर्धात वर्तमानपत्रांचे महत्त्व मोठे असून, ते वर्तमानपत्र वाचून दिवस सुरू करण्याची आसक्ती प्रत्येकाच्या मनात देशभरात असते. ही उत्सुकता जोपर्यंत आहे, तोपर्यंत वर्तमानपत्राचे अस्तित्त्व अबाधित राहील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई-पुणे-नाशिक हा नागरिकीकरण व औद्योगिकीकरणाचा सुवर्ण त्रिकोण आहे. आता रायगड जिल्हा जोडला जाऊन हा नवीन सुवर्ण चौकोन तयार होईल, अशावेळी या जिल्ह्याच्या भौतिक समस्या मांडण्याचे व जिल्ह्याची विचारधारा बळकट करण्याचे काम जिल्ह्यातील पत्रकारांनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून व वास्तववादी लिखाणातून करण्याचे आवाहन सुनील तटकरे यांनी केले.

वास्तव आणि लिखाण यांच्यात कोणताही फरक राहणार नाही, याची दक्षता पत्रकारांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून घ्यायची असते. भालचंद्र दिवाडकरांनी हीच दक्षता गेली अनेक वर्षे परिपूर्ण पद्धतीने घेतल्यानेच त्यांना आज डॉ. चिंतामणराव देशमुख स्मृति पत्रकारिता पुरस्कारासारखा मानाचा पुरस्कार मिळाल्याचे सांगताना त्यांच्या मार्गदर्शनातून व्यासंगी लिखाण करण्याची शिकवण तरूण पिढीतल्या पत्रकारांना भविष्यातही मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा येथे व्यक्त केला.

रोहा तालुका पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सुनील तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोहा तालुका पंचायत समितीच्या सभापती राजश्री पोकळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष समीर सकपाळ, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष विजय मोरे, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोलाटकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी रोहा तालुका पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा डॉ. चिंतामणराव देशमुख स्मृति पत्रकारिता पुरस्कार दैनिक सागरचे कार्यकारी संपादक भालचंद्र दिवाडकर यांना, स्व राजाभाऊ देसाई शोध पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकसत्ताचे हर्षद कशाळकर यांना व स्व. जनार्दन शेडगे उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार दैनिक लोकमतचे छायाचित्रकार दत्तात्रय खेडेकर यांना यावेळी वितरित करण्यात आला.

स्व. राजाभाऊ देसाईंनी कारकिर्दीत लिहिलेल्या वार्तापत्रांचे व स्व. जनार्दन शेडगे यांच्या छायाचित्रांचे संकलन करण्याचे सुचवून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे तटकरेंनी आश्वासन दिले. तसेच कोलाड येथील पत्रकार भवनालाही आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दत्तात्रय खेडेकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे सचिव पराग फुकणे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष दिलीप वडके यांनी आभार मानले. विद्या घोडिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष अमित उकडे, कार्याध्यक्ष चंद्रकांत पार्टे, तानाजी देशमुख, आप्पा देशमुख, पांडुरंग सरफळे, यशवंत शिंदे, यांसह रोहेकर नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com