मुंबई-गोवा खड्ड्यांचा महामार्ग; गणेशोत्सवात भविकांचे हाल

रविंद्र पेरवे 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

वडखळ - महाड दरम्यान मोजक्याच ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्याव्यतिरिक्त कुठेही खड्डे बूजवण्याचे काम सुरु नाही.

लोणेरे (जि. रायगड) : मुंबई - गोवा खड्ड्यांचा महामार्ग  गणेशोत्सवासाठी अवघे सतरा दिवस शिल्लक असताना मुंबई - गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे आ वासून उभे आहेत. वडखळ - महाड दरम्यान मोजक्याच ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्याव्यतिरिक्त कुठेही खड्डे बुजवण्याचे काम सुरु नाही. त्यामुळे तुर्तास तरी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास याच खड्ड्यांतून होणार असे दिसते. या महामार्गासाठी अनेकवेळा पत्रकारांसह राजकीय संघटना रस्त्यावर उतरल्या. मात्र सत्ताधारी व विरोधकांकडून दाखल घेतली जात नाही. 
 

Web Title: There are lot of hole on road of mumbai goa highway