esakal | १ मे महाराष्ट्र दिनी शाळांत ध्वजारोहण नाहीच ; एकनाथ आंबोकर
sakal

बोलून बातमी शोधा

There is no flag hoisting in schools on Maharashtra Day kokan marathi news

कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यातील कोणत्याही माध्यमच्या शाळेत ध्वजारोहण करण्यात येवू नयेत, असे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने काढले आहेत...

१ मे महाराष्ट्र दिनी शाळांत ध्वजारोहण नाहीच ; एकनाथ आंबोकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यातील कोणत्याही माध्यमच्या शाळेत ध्वजारोहण करण्यात येवू नयेत, असे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने काढले असून त्याचे पालन जिल्ह्यातील सर्व शाळांनी करावे, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी आदेशाद्वारे केल्या आहेत.

हेही वाचा- आदि मारलं कोरोनान आता मारलं वादळान ; सांगा आम्ही करायचं तरी काय ?

कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर केंद्र शासनाने देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर केले आहे. त्यामुळे या कालावधीत घरातून बाहेर पडण्यास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी, नागरिक यांच्या व्यतिरिक्त सर्वांना मनाई आहे. मनाई असलेल्यांमध्ये शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालक-ग्रामस्थ यांचा समावेश आहे.

त्यामुळे १ मे या महाराष्ट्र दिनी या व्यक्तींना बाहेर पडता येणार नाही. परिणामी शासनाने परिपत्रक काढत प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालय यांमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यास मनाई केली आहे. परिणामी महाराष्ट्र दिनी शाळा, कॉलेजमध्ये कोणीही ध्वजारोहण करू नये, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी काढले आहेत. 

loading image