उद्या दापोलीत या सेवा राहणार बंद....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

दापोली शहरात तसेच परिसरात कोणतेही वृत्तपत्र वितरित होणार नाही. तसेच पेपर स्टॉलही बंद राहणार. 

दाभोळ (रत्नागिरी) : कोरोनाच्या जागतिक संकटाशी मुकाबला करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युच्या केलेल्या आवाहनास सक्रिय प्रतिसाद म्हणून उद्या ता. 22 मार्च रोजी दापोली शहरात तसेच परिसरात कोणतेही वृत्तपत्र वितरित होणार नाही. तसेच पेपर स्टॉलही बंद राहणार असल्याने पेपर विक्रीही होणार नसल्याचे वृत्तपत्र वितरण संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्ग लाॅकडाऊन : काय राहणार बंद,काय सुरू.... वाचा....

फेरीबोट सेवा​ही बंद
रायगड, रत्नागिरी हे दोन जिल्हे जलवाहतुकीने जोडणारी फेरीबोट सेवाही उद्या सकाळी 7 ते रात्री 9 वाजता बंद ठेवण्यात आली आहे, जयगड, दाभोळ, वेसवी व आगरदांडा येथील ही सेवा बंद असल्याचे सुवर्णदुर्ग शिपिंग चे डॉ. योगेश मोकल यांनी कळवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These services will remain closed in Dapoli tomorrow kokan marathi news