कबूतर प्रजातीमधील (Pigeon Species) हा अत्यंत देखणा, सप्तरंगी पक्षी या खास ठिकाणच्या भागात असलेल्या झाडांवरील फळे खाताना ओंकार बापट यांना दिसला.
चिपळूण : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ‘थिक बिल्ड् ग्रीन पिजन’ (Thick Billed Green Pigeon) या दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन झाले आहे. गेले काही दिवस हा अतिशय सुंदर पक्षी शहराच्या मध्यवर्ती वर्दळीच्या नागरी वस्तीत निदर्शनास येत आहे. थिक बिल्ड ग्रीन पिजन अर्थातच कबूतर प्रजातीमधील हा अत्यंत सुंदर पक्षी चिपळुणात आढळल्याने पक्षी निरीक्षक-अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.