130 गाड्यांतून हजार चाकरमानी दापोलीत हजर...

thousand people  in 130 bus came in Dapoli
thousand people in 130 bus came in Dapoli
Updated on

दाभोळ (रत्नागिरी) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महानगरांमधून निघालेल्या चाकरमान्यांचा ओघ दापोली तालुक्यात वाढत आहे. मिळेल त्या वाहनाने चाकरमानी कुटुंबासह गावी परतत असून दोन दिवसात लहान-मोठ्या 130 गाड्यांमधून सुमारे एक हजार चाकरमानी दापोलीत दाखल झाले. दापोली शहरात त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गावी पाठविण्यात येत आहे. लॉकडाऊन  सुरू झाल्यानंतर गावी परतण्यासाठी परवानगी देण्यास सुरवात केल्यावर अनेक मुंबईकर आपापल्या गावी आले आहेत.

रविवारी  मुंबईमधून हजारो चाकरमानी शेकडो वाहनांमधून दापोली येथे येत आहेत. शहरातील कोकण कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवन येथे त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन त्यांना गावी पाठविण्यात येत आहे. चाकरमान्यांचा गावी येण्याचा ओघ वाढत असल्याने आरोग्य तपासणी कक्ष वाढविण्यात आले आहेत. चाकरमान्यांचा वाढत्या ओघामुळे प्रशासनावर प्रचंड ताण येत असून पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांवर जास्त ताण येत आहे. रविवार व सोमवारी दिवसभर दापोली बसस्थानक ते कोकण कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवन दरम्यानच्या मार्गावर चाकरमान्यांचा ओघ दिसून येत आहे. अनेकजण कुटुंबासह शेतकरी भवनकडे चालत जात असल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवस दापोली बाजारपेठ बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. हॉटेलही बंद असल्याने चाकरमान्यांना साधा वडापावही मिळाला नाही. सकाळी दापोली येथे चाकरमान्यांना घेऊन आलेल्या बसेस, टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकांचा वाहन परवाना बुरोंडी नाका चेकपोस्ट येथील पोलिसांच्या पथकाने जमा करून घेतला. तहसीलदारांच्या आदेशानुसार या बसेसना सोडण्यात येणार नाही असे पोलिसांनी सांगितले. आज सकाळपासून आलेल्या या बसेसच्या चालकांना चहा, पाणीही मिळाले नाही. तसेच त्यांना जेवणही उपलब्ध झालेले नसल्याने ते उपाशीच दुपारपर्यंत गाड्यांमध्ये बसून आपल्याला जायला कधी मिळेल याची वाट पहात आहेत.

पुन्हा याच बसेस दिसल्यास गुन्हा या संदर्भात दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला असता ज्या बसेसमधून विनापरवाना प्रवास आणले आहेत, त्या चालकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात येणार आहे. पुन्हा याच बसेस विनापरवाना प्रवासी घेऊन आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नोटीस देऊन सोडले या बसेसच्या चालकांना नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आल्याची माहिती दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com