सावधान ! सावंतवाडी तहसिलमध्ये तिघे कोरोना पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. या पार्श्‍वभुमीवर येथील तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेले एक मंडळ अधिकारी व दोघे तलाठी असे तिघे कर्मचारी पॉझिटिव्ह झाले आहेत.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील तहसीलदार कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सॅनिटायझर करण्यासाठी दोन दिवस कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. या पार्श्‍वभुमीवर येथील तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेले एक मंडळ अधिकारी व दोघे तलाठी असे तिघे कर्मचारी पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे सुरक्षेचा भाग लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तालुक्‍याचा विचार करता स्थानिक रुग्णात वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सुरवातीला मुंबई, पुणे याठिकाणावरुन आलेले व क्वारंटाईन असलेले व्यक्तीच पॉझिटिव्ह आढळून येत होते; मात्र आता गावागावातील व्यक्तीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. शहरात उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता तहसिल कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह आले आहेत.

तहसिल व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नेहमी लोकांची ये-जा सुरु असते. त्यामुळे या रोगाची लागण इतरांना होण्याची संभावना आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना सर्वांना घबरदारी घेण्याची सुचना यंत्रणेकडून करण्यात आली आहे. खबरदारी म्हणुन तहसिल कार्यालय दोन दिवस बंद राहणार आहे. या काळात संपुर्ण कार्यालय सॅनिटायझर करुन घेण्यात येणार आहे, असे तहसिलदार म्हात्रे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Corona Positive In Sawantwadi Tahasil Office