esakal | कोकणात तीन धरणांसाठी 54 कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

for three dam in konkan 54 crore budget sanctioned in ratnagiri

पाणी साठवण तलावांचे एकूण २० प्रस्ताव त्यांनी सादर केले आहेत.

कोकणात तीन धरणांसाठी 54 कोटींचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील तळसर, मुंढेतर्फे सावर्डे आणि वांझोळे या तीन गावांत धरणाबरोबरच दोन पाणी साठवण तलाव मंजूर झाले आहेत. त्यावर तब्बल ५४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्याच्या तिन्ही तलावांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. कोरोना महामारीत निधीची कमतरता जाणवत असतानाच आमदार शेखर निकम यांच्या आग्रही मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

आमदार शेखर निकम यांनी प्रामुख्याने कृषी, सहकार, सिंचन, आरोग्य आणि रोजगार याकडे प्रामुख्याने लक्ष दिले आहे. मतदार संघात भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी योजनांचे प्रस्ताव तयार करून पाठपुरावा सुरू ठेवला. आमदार निकम हे दर आठवड्याला मुंबईला मंत्रालयात जाऊन आपल्या मागण्यांवर पाठपुरावा करत आहेत. शहरातील मुरादपूर पुलाला नऊ कोटी मंजूर केल्यानंतर चिपळूण व संगमेश्वरमधील मोठे पूल, पाणी योजना मंजूर केल्या आहेत.

हेही वाचा - दिल्लीला महसूल पाठवणे झाले बंद अन् सावंतवाडीच्या स्वतंत्र कारभाराची नांदी झाली सुरु

पाणी साठवण तलावांचे एकूण २० प्रस्ताव त्यांनी सादर केले आहेत. मुळातच हे प्रस्ताव, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, मंजुरी, आर्थिक तरतूद होईपर्यत अनंत अडचणी असतात; मात्र असे असतानाही त्यातील वांझोळे, मुंढेतर्फे सावर्डे, तळसर, रिक्‍टोली आणि शिरगांव असे धरणाबरोबरच पाणीसाठवण तलाव मंजूर झाले आहेत. त्यातील वांझोळे, मुंढेतर्फे सावर्डे, तळसर या तीनही तलावांच्या निविदा जलसंधारण विभागाकडून प्रसिद्ध झाल्या आहेत. 

शिरगाव, रिक्‍टोलीसाठी लवकरच निविदा

संगमेश्वर तालुक्‍यातील वांझोळे येथील लघु पाटबंधारेच्या धरणासाठी २२ कोटी ५० लाख, चिपळूण तालुक्‍यातील मुंढेतर्फे सावर्डे २१ कोटी ५४ लाख तर तळसर येथील तलावासाठी ९ कोटी ५ लाख रुपये खर्च येणार आहे. लवकरच शिरगाव व रिक्‍टोलीतील कामांच्या निविदा प्रसिद्ध होणार आहेत.

संपादन - स्नेहल कदम