खेडमधील 'त्या' तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Three Girls From Khed Taluka Safe In China Ratnagiri Marathi News

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत सादियाशी दूरध्वनीवर गुरुवारी (ता. 30) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संपर्क केला. त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांचा सुट्ट्यांचा कालावधी किमान एक महिना वाढवावा व त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्यादृष्टीने चीनमधील भारतीय दूतावासासोबत पत्रव्यवहार आपण करू असे चव्हाण यांनी सांगितले.

खेडमधील 'त्या' तीन विद्यार्थिनी चीनमध्ये सुखरूप 

रत्नागिरी - चीनमधील नॅनटॉग प्रांतात विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेल्या खेड तालुक्‍यातील तीन विद्यार्थिनी सुरक्षित असून त्यांच्याकडे जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. 

या विद्यार्थिनींपैकी सादिया बशीर मुजावर तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला. त्यानंतर ही माहिती त्यांनी दिली. खेडमधील सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदूले आणि सादिया बशीर मुजावर या तीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये राहत आहेत. सध्या त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी आहे. या सुट्ट्या 23 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहेत. चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही. या तीनजणी त्यामुळे घरातच आहेत.

हेही वाचा - रा. स्व. संघाचे विभागसंचालक पांडुरंग वैद्य यांचे निधन

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत सादियाशी दूरध्वनीवर गुरुवारी (ता. 30) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संपर्क केला. त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांचा सुट्ट्यांचा कालावधी किमान एक महिना वाढवावा व त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्यादृष्टीने चीनमधील भारतीय दूतावासासोबत पत्रव्यवहार आपण करू व लवकरात लवकर त्यांना भारतात आणू, असे जिल्हाधिकारी यांनी त्यांना आश्वस्त केले. 

हेही वाचा - कातळशिल्प संवर्धनासाठी 24 कोटी, पण प्रत्यक्षात...

टॅग्स :IndiaChina