रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरांच्या विस्तारीकरणाचे काम फास्ट ट्रॅकवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

गती मिळावी, यासाठी निधी उपलब्ध करून ताबडतोब काम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरी : जिल्ह्यातील हर्णै, मिरकरवाडा व साखरीनाटे या तीन बंदरांच्या विस्तारीकरणाचे काम आता फास्ट ट्रॅकवर येणार आहे. या कामाला निधी उपलब्ध करून काम ताबडतोब चालू करण्यात येणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत ही कामे मंजूर असून मुंबईत झालेल्या खासदार, आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा - सोनवडे-घोटगे घाटासाठी 590 कोटी -

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी (१५) कोकण विभागातील महसूल, ग्रामविकास, बंदरे व खारजमीन विकास विभागातील अडचणी सोडवण्याबाबत बैठक झाली. महसूल, ग्रामविकास, बंदर व खारजमीन विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी कोकणातील खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत, तसेच सर्व आमदार उपस्थित होते. जिल्ह्याचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. तरी जिल्ह्यातील बंदरांची अवस्था अतिशय दयनीय आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा सागरमाला योजनेंतर्गत जिल्ह्यातील हर्णै, मिरकरवाडा व साखरी नाटे या तीन बंदरांच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, निधीअभावी ही कामे ठप्प झाली आहेत. त्यांना गती मिळावी, यासाठी निधी उपलब्ध करून ताबडतोब काम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील समुद्रालगत असलेल्या जेटीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

हेही वाचा - आंबोलीत माशाची नवी प्रजाती -

संगमेश्वर तालुक्‍यातील धामापूरतर्फे संगमेश्वर गाव आहे. त्याची हद्द खूप मोठी आहे. यामध्ये शिवधामापूर नवे गाव निर्मित करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे प्रलंबित आहे. तोही मार्गी लागावा, असे निकम म्हणाले. बैठकीला उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार राजेंद्र गावित, दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, आमदार श्रीनिवास वणगा, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजन साळवी आदी उपस्थित होते. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three ports work are start fastly in ratnagiri mirkwada, harne and sakahrinate port