esakal | राष्ट्रीय हरीत लवादच्या आदेशाने गुहागर समुद्रकिनाऱ्यावर झाली `ही` कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Three Sea View Galleries Removed In Guhagar Ratnagiri Marathi News

सीआरझेडची परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या सी व्ह्यू गॅलऱ्या तोडून टाकाव्यातस असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते.

राष्ट्रीय हरीत लवादच्या आदेशाने गुहागर समुद्रकिनाऱ्यावर झाली `ही` कारवाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुहागर ( रत्नागिरी ) - राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशावर हकुम गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील तीनही सी व्ह्यू गॅलऱ्या जमीनदोस्त केल्या आहेत. या तीनही सी व्ह्यू गॅलऱ्याचा मलबा शासकीय विश्रामगृहाजवळील शासनाच्या मालकीच्या जागेत टाकण्यात आला आहे. 

सीआरझेडची परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या सी व्ह्यू गॅलऱ्या तोडून टाकाव्यातस असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. त्याप्रमाणे शनिवारी उपविभागीय अधिकारी, वन विभाग, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सी व्ह्यू गॅलऱ्या तोडण्यास सुरवात झाली. रविवारी (ता. 9) गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील तीन्ही सी व्ह्यू गॅलऱ्या तोडण्याची प्रक्रिया संपली. तोडल्यानंतर निर्माण झालेला मलबा (राडारोडा) शासकीय विश्रामगृहाजवळ शासकीय जागेत टाकण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेचे छायाचित्रिकरणही करण्यात आले आहे. 

हरीत लवादाचा निर्णय असल्याने त्यावर जाहीर टिप्पणी कोणीही करत नाही. मात्र या कार्यवाहीबद्दल गुहागरवासीयांच्या मनात नाराजी आहे. त्याचे पडसाद व्हॉटस ऍप, फेसबुक आदी सार्वजनिक माध्यमांमध्ये उमटत आहेत. या सी व्ह्यू गॅलऱ्या अनधिकृत असल्यातरी त्यांचा वापर सार्वजनिक प्रयोजनार्थ होता. त्यावर अशी कार्यवाही नको होती. त्या तोडून कोणाचा फायदा झाला. समुद्रकिनाऱ्याची धुप जेटी व समुद्रदर्शनी तोडून थांबणार का, एलएनजी टर्मिनलजवळील ब्रेक वॉटर वॉलचा फटका गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याला बसत आहे. त्याकडे कोणी लक्ष देणार का, अशा अनेक मुद्‌द्‌यांची चर्चा सार्वजनिक माध्यमांवर सुरू आहे. 

बेकायदेशीर बांधकामांवर निश्‍चितच कारवाई झाली पाहिजे असे मानणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमधील मी एक आहे. तरीही या घटनेने मी विचलित व निराश झालो आहे. मागील दहा वर्षात गुहागरमधील पर्यटन व्यवसायाला बळकटी मिळाली. शहराच्या सौदर्यामध्ये भर पडली. मात्र या कारवाईने पर्यटन व्यवसाला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आतातरी गुहागरवासीयांनी एकत्र येवून पर्यटन विकासाचे शाश्वत मॉडेल उभे करावे. 
- ऍड. संकेत साळवी, शिवतेज फाऊंडेशन 
 

संपादन - राजेंद्र घोरपडे

loading image