
वनविभाग सतर्क असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights):
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतच्या शिरगाव–तळसर जंगलात पुन्हा पट्टेरी वाघाचा वावर!
डरकाळ्या आणि पंजाचे ठसे आढळल्यानंतर वनविभाग सतर्क झाला आहे.
वनविभागाने बसवले चार ट्रॅप कॅमेरे आणि घेतले नमुने
पंजाच्या ठशांचे प्लास्टर कास्टिंग आणि प्रयोगशाळेतील तपासणी सुरू आहे.
गेल्या वर्षीही याच परिसरात वाघाच्या हालचालींचे संकेत मिळाले होते
यंदा पुन्हा त्याच भागात डरकाळ्या ऐकू आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीचे वातावरण.
Sindhudurg Villages In Tiger : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास लागून असलेल्या शिरगांव-तळसर गावाच्या सीमेवरील जंगलात पट्टेरी वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असताना त्यांच्या पंजाचे ठसेही सापडल्यानंतर जिल्हा वनविभाग सतर्क झाला. सोमवारी सायंकाळी पथकाने घटनास्थळी जाऊन ठसे मिळालेल्या ठिकाणी प्लास्टर कास्टिंगसह या परिसरात चार ट्रॅप कॅमेरे जंगलात बसवले आहेत. प्रथमदर्शनी वाघ असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने काढला असून, काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेतले आहेत.