रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

मडगाव-नागपूरला शेगाव थांबा मंजूर
रत्नागिरी : जम्मू काश्मीर येथे ६ नोव्हेंबर २०२२ रोजी केआरयुसीसीच्या झालेल्या बैठकीत मडगाव- नागपूर ही गाडी आता कायमस्वरूपी आठवड्यातून दोनदा धावत असून या मार्गावरील शेगांव या ठिकाणी या ट्रेनला थांबा मिळावा अशी मागणी भाजपा सरचिटणीस व कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत प्रशासनाने दर बुधवार व शनिवार संध्याकाळी नागपूर ते मडगाव तसेच गुरूवार व रविवार रात्री मडगाव ते नागपूर एक्स्प्रेसला शेगाव स्टेशनला थांबण्याची मंजुरी दिली आहे. भाजपा सरचिटणीस व कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. ते पुढे म्हणाले की, विदर्भामधील अनेक संघटना, श्री गजानन महाराज यांच्या भक्त गणांनी ही मागणी केली होती. या ट्रेनची तिकिटे उपलब्ध असून रत्नागिरीतील प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वहाळकर यांनी केले आहे. भक्तगणांची होणारी गैरसोय रेल्वे प्रशासनाने दूर केल्याबद्दल पुन्हा विशेष आभार मानले.
-----------------

देवरुखात तीन दिवस अभिरुचीचा स्वरोत्सव
साडवली ः देवरुखातील अभिरूची संस्थेतर्फे दरवर्षी अभिजात संगित, नाट्य व नृत्य यांनी सजलेला महोत्सव संगीत प्रेमींसाठी स्वरोत्सव ओयोजित केला जातो. यंदा हा स्वरोत्सव ७ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित करणेत आला आहे. यात ७ जानेवारीला पातियाळ घराण्याचे सुप्रसिद्ध गायक व पद्मश्री जगदिश प्रसाद यांचे शिष्य रमाकांत गायकवाड यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन तर ८ ला अभिषेक बोरकर यांची सरोन वादनाची मैफिल रंगणार आहे. ९ ला राज्य संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेले परस्पर सहाय्यक मंडळाचे मंदारमाला हे संगीत नाटक होणार आहे. हा स्वरोत्सव पित्रे प्रायोगिक कलामंच येथे होणार असून या विनामूल्य असलेल्या स्वरोत्सवाचा आस्वाद संगित रसिकांनी घ्यावा, असे आवाहन अभिरूची संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
-------------

रत्नागिरीत उद्या
कीर्तनसंध्येस प्रारंभ
रत्नागिरी : येत्या मंगळवारपासून (ता. ३) ते ७ जानेवारीपर्यंत प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तनसंध्या रंगणार आहे. यात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे राजपुतांचा इतिहास उलगडणार आहेत. रत्नागिरीत २०१२ पासून कीर्तनसंध्या सुरू आहे. महाजन क्रीडा संकुलात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कीर्तने होतील. आजवर कीर्तनसंध्येच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्जिकल स्ट्राइकपर्यंतचा भारतीय इतिहास कीर्तनातून लोकांसमोर मांडण्यात आला आहे. यावर्षी आफळे बुवा आपल्या अमोघ वाणीतून राजपुतांचा इतिहास कीर्तनातून मांडणार आहेत. त्यामध्ये पृथ्वीराज चौहान, जयचंद गढवाल, राणा कुंभ, राणा संग, राणा प्रताप, संत मीराबाई यांच्याविषयी बुवा निरूपण करणार आहेत. हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलीन) हे साथीदार बुवांना संगीतसाथ करणार आहेत.