
पावस-जिल्ह्यात गारठा वाढल्याने बागायतदार आनंदित
७२५५८
७२५५९
पान ५ साठी
गारठा वाढल्याने बागायतदार आनंदीत
आंबा, काजूला फळधारणा ; हंगामाला पोषक हवामान
पावस, ता. १ ः जिल्ह्यातील तापमान पुन्हा घसरू लागल्याने आंबा बागायतदार आनंदित झाले आहेत. थंडीबरोबरच दिवसभर कडकडीत उन पडू लागल्याने आंबा आणि काजू कलमेही चांगली मोहोरली असून अनेक ठिकाणी फळधारणा झालेली दिसून येत आहे.
जिल्ह्यात गेले दोन आठवडे देशाच्या पूर्व भागातील वादळामुळे वातावरण बदलले होते. थंडी गायब होऊन मळभी वातावरण होते. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला होता. त्यामुळे बागायतदार चिंतेत होते. तुडतड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन बागायतदारांनी फवारणी सुरू केली होती. अनेक ठिकाणी विचित्र हवामानामुळे मोहोर गळून गेला तर काही ठिकाणी फळधारणाच झाली नाही. गेले चार दिवस मात्र वातावरण पुन्हा स्वच्छ झाले आहे. थंडी पुन्हा पडू लागली आहे. पाराही घसरू लागला आहे. दापोलीत यावर्षीचे निच्चांकी तापमानाची (११ अंश) नोंद झाली होती. गारठा वाढू लागल्याने आंबा, काजू कलमांना मोहोर येऊ लागला असून अनेकठिकाणी कणीएवढी फळे धरली आहेत. पुढील काही दिवस थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये आनंदांचे वातावरण आहे.
गेल्या चार दिवसातील दापोलीतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२९ डिसेंबर-१५.७
३० डिसेंबर-१५.२
३१ डिसेंबर-१९.००
१ जानेवारी-१८
----
पुढील तीन दिवसाचे अपेक्षित तापमान
२ जानेवारी- १७.०० अंश सेल्सिअस
३ जानेवारी-१७.००
४ जानेवारी-१८.००