
बक्षीस वितरण
rat०२१८.txt
(टुडे पान २ साठी, संक्षिप्त)
फोटो ओळी
-rat२p७.jpg-
७२६५०
रत्नागिरी ः मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्याला गौरविताना नेहा माने.
---
मानेज् इंटरनॅशनल स्कूलमध्ये बक्षीस वितरण
रत्नागिरी ः कुवारबाव येथील मानेज् इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साही वातावरणात साजरा झाला. या वेळी शाळेच्या कार्याध्यक्षा नेहा माने, मुख्याध्यापक उल्हास सप्रे उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
---
आंबेत खाडीत जान्हवी बोट प्रवाशांसाठी रूजू
दाभोळ ः मंडणगड, दापोली तालुक्यांना रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या आंबेत खाडीतून प्रवास करणाऱ्यांच्या दिमतीला चाळीस गाड्या एका वेळी वाहतूक करू शकेल एवढ्या क्षमतेची जान्हवी बोट डॉ. चंद्रकांत मोकल यांनी प्रवाशांसाठी रूजू केली आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडणारा आंबेत खाडी पूल नादुरुस्त झाल्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पुलावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक गेले अनेक महिने बंद करण्यात आली असून, प्रवाशांना पर्याय म्हणून शासनाच्या खर्चाने फेरीबोट सेवा सुरू आहे; मात्र वर्षअखेरीला दापोली व मंडणगडकडे येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेऊन सध्या अस्तित्वात असलेली फेरीबोटीची क्षमता कमी पडत असल्याने सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीचे चेअरमन डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी ४० वाहने राहतील अशी जान्हवी फेरीबोट बोट प्रवाशांकरिता येथे रूजू केली आहे. नुकताच तिचा आरंभ डॉ. चंद्रकांत मोकल यांच्या हस्ते करण्यात आला.
--
निगडेत निवासी श्रमसंस्कार शिबिर
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव निगडे येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद करमरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, निगडेचे सरपंच वसंत घरवे, खेमदेव ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र रेवाळे आदींसह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. शिबिरात विद्यार्थ्यांनी ३ वनराई बंधारे बांधले. त्याचबरोबर चित्रकला कार्यशाळा, आरोग्य तपासणी शिबिर रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता, परसबाग, रॅली, हळदीकुंकू, कापडी पिशव्या वाटप, शाळा परिसर रंगरंगोटी, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम घेण्यात आले. शिबिरामध्ये विविध तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन देखील करण्यात आले होते. प्रा. अजिंक्य मुलुख यांचे पथनाट्य या विषयावर, प्रा. संतोष मराठे यांचे संवादकौशल्य यावर व्याख्यान झाले. डॉ. विक्रम मासाळ यांचे जलसंधारण आणि पिकसमृद्धी तर डॉ. राजेंद्र मोरे यांचे सेवाभावी संस्था आणि आपण, प्रा. कैलास गांधी आणि प्रा. श्रेयस मेहेंदळे यांनी घर कवितांचे या कार्यक्रमातून कवितांचे जग उपस्थितांसमोर उलगडले. प्रा. दिगंबर कुलकर्णी यांनी या शिबिरात योगा मार्गदर्शन केले.
-