-गिरीश ओक, कवी अशोक बागवे येणार माडबन शाळेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-गिरीश ओक, कवी अशोक बागवे येणार माडबन शाळेत
-गिरीश ओक, कवी अशोक बागवे येणार माडबन शाळेत

-गिरीश ओक, कवी अशोक बागवे येणार माडबन शाळेत

sakal_logo
By

rat०२२१.txt

बातमी क्र..२१ (टुडे पान २ साठीमेन)

फोटो ओळी

-rat२p८.jpg ः
७२६५१
राजापूर ः माडबन जिल्हा परिषद शाळा.
-rat२p९.jpg ः
७२६५२
गिरीश ओक

--

गिरीश ओक, कवी अशोक बागवे येणार माडबन शाळेत

आजपासून शताब्दी महोत्सव ; वेटलिफ्टर अनुजा तेंडोलकरांचीही उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांसह समाज घडवणारे शिक्षक, वकील, सिनेकलाकार, नाटककार आदींसह तालुक्यातील माडबन येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने येत्या बुधवारी (ता. ४) आणि गुरुवारी (ता. ५) विविध कार्यक्रमांचे प्रशालेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्ताने ९६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या जगप्रसिद्ध ‘वस्त्रहरण’ या नाटकासह ‘विठ्ठल विठ्ठल’ या नाटकांचे स्थानिक संचातील नाट्यप्रयोगही होणार आहेत.
माडबनचे सुपुत्र गवाणकर यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून माडबन गाव सातासमुद्रापार गेले आहे. या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये येत्या बुधवारी सकाळी ७ वा. सत्यनारायणाची महापूजा, ९.३० वा. वृक्षारोपण, १० वा. उद्घाटन आणि सत्कारसोहळा, दुपारी ३ ते ५ माडबन केंद्राचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वा. श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्यमंडळ जानशीनिर्मित ‘विठ्ठल विठ्ठल’ या नाटकाचा २२ वा प्रयोग होणार आहे. गुरुवारी सकाळी १० वा. माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा, दुपारी २.३० वा. हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर, सायं. ४ वा. माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वा. ‘वस्त्रहरण'' या नाटकाचा स्थानिक कलाकारांच्या संचातील नाटकाचा प्रयोग होणार आहे.
कार्यक्रमांना आमदार राजन साळवी, उपविभागीय अधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, गटविकास अधिकारी सुहास पंडित, गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, सागरी पोलिस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील आदींसह प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, कवी व साहित्यिक अशोक बागवे, वेटलिफ्टर व ‘स्ट्राँगेस्ट वूमन ऑफ आशिया’ अनुजा तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शतक महोत्सव कमिटी मुंबईचे अध्यक्ष शैलेश वाघधरे, सचिव अ‍ॅड. दत्तराज शिरवडकर, मनोज वाघधरे, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष शामसुंदर गवाणकर, संदीप कदम, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व ग्रामस्थ व पालकांनी आणि शतक महोत्सव कमिटीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.