
विज्ञान प्रदर्शन
rat०२३.txt
(टुडे पान १ साठी, संक्षिप्त)
आंजर्लेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
दाभोळ ः दापोली पंचायत समिती व आंजर्ले शिक्षणसंस्था आंजर्ले संचलित एम. के. इंग्लिश स्कूलतर्फे ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि खेळणी असा या प्रदर्शनाचा विषय आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळी १० वा. विज्ञानदिंडी, ११ वा. उद्घाटन सोहळा, प्रतिकृती परीक्षण व खुले प्रदर्शन, बुधवारी (ता. ४) सकाळी १० ते १२ वा. प्रश्नमंजूषा, दुपारी २ वा. बक्षीस वितरण व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते होणार असून आंजर्ले शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष सुरेश सरनोबत, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, आंजर्ले शिक्षणसंस्थेचे संचालक, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
--------
सुकदर भवानीदेवीचा शुक्रवारी जत्रोत्सव
खेड ः तालुक्यातील सुकदर येथील ग्रामदैवता भवानीदेवीचा जत्रोत्सव शुक्रवारी (ता.६) होणार आहे. या निमित्त विविधांगी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गावचे मानकरी यांनी पूजाअर्चा केल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी वर्दळ सुरू होईल. गावालगतच्या देवी महामाई, काळकाई, मानाईदेवीची पालखी सजवून भवानीदेवीच्या जत्रोत्सवासाठी आणली जाणार आहे. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून रात्री पालखी नाचवली जाईल. भाविकांनी जत्रोत्सवात देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय भवानी विकास मंडळाचे सचिव अशोक कोळंबे यांनी केले आहे.
----