कुडुकखुर्द बौद्धवाडीत सहा दिवस पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडुकखुर्द बौद्धवाडीत सहा दिवस पाणी बंद
कुडुकखुर्द बौद्धवाडीत सहा दिवस पाणी बंद

कुडुकखुर्द बौद्धवाडीत सहा दिवस पाणी बंद

sakal_logo
By

rat०२१९.txt

(पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat२p२६.jpg ः
७२७१८
मंडणगड ः तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन सादर करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे कार्यकर्ते व ग्रामस्थ.
---
कुडुकखुर्द बौद्धवाडीत पाणी टंचाई

ग्रामस्थांची गैरसोय ; नवीन नळपाणी योजनेच्या कामाकरिता जुनी योजना केली बंद

मंडणगड, ता. २ ः कुडुक खुर्द-बौद्धवाडी येथील वयोवृद्ध नागरिक, महिला व सर्वच नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून वाडीतील नागरिकांची जाणीवपूर्वक गैरसोय करणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या सहा दिवसांपासून कुडुक खुर्द बौद्धवाडी येथे पाण्याची गैरसोय जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. कुडुक खुर्द यांच्या कार्यक्षेत्रातील बौद्धवाडीतील नागरिकांसाठी नळपाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित होती; परंतु शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून या योजनेच्या दुरुस्तीच्या नावाखाली पूर्वी असलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वकल्पना न देता व पाण्याची पर्यायी व्यवस्था न करताच पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय झाली आहे. नागरिकांना गेल्या सहा दिवसांपासून नाहक त्रास दिला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडे वाडीतील ग्रामस्थांनी चौकशी केली असता त्यांनी मंजूर कामाच्या कार्यारंभ आदेशाची प्रत दाखवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांच्याबाबत शंका निर्माण होत असून, जाणीवपूर्वक मागासवर्गीय वस्तीतील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. तहसीलदारांनी या संदर्भात त्यांच्या स्तरावरून ग्रामपंचायतीच्या विरोधात चौकशी करून वाडीतील नागरिकांच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था त्वरित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामस्थांची मागणी मान्य झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष राजेश साळवी, माजी तालुकाध्यक्ष राजेश गमरे, युवा कार्यकर्ता राजेश खैरे, महेश मर्चंडे, सुनील मोरे, सौरभ खैरे यांच्या सह्या आहेत.