मळेवाडमध्ये उद्या बाल साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळेवाडमध्ये उद्या बाल साहित्य संमेलन
मळेवाडमध्ये उद्या बाल साहित्य संमेलन

मळेवाडमध्ये उद्या बाल साहित्य संमेलन

sakal_logo
By

मळेवाडमध्ये उद्या बाल साहित्य संमेलन
कोमसापचा उपक्रमः ग्रंथदिंडी, परिसंवादासह विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व मळेवाड कोंडुरा ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी (ता. ४) मळेवाड प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे जिल्हास्तरीय बाल साहित्य संमेलन व बाल संसद भरविण्यात येत आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शालेय बाल साहित्यिक वैष्णवी मुळीक असून उद्घाटक म्हणून सुचिता कारुडेकर, प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुस्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, वैष्णवी नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात सकाळी ९.३० वाजता शाळा क्रमांक एक मळेवाड येथे ग्रंथदिंडी, मळेवाड नाका येथे समारोप, १० वाजता मळेवाड शाळा क्रमांक २ येथे आगमन, १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन, ११.३० वाजता बालकांचा परिसंवाद, १२ वाजता लेखकांची मुलाखत, १२.३० वाजता बाल कवी संमेलन, दुसऱ्या सत्रात २.३० वाजता बाल संसद, ३.३० वाजता बालरंजन कार्यक्रम (आवाज आर्ट फाउंडेशन), ४ वाजता आभार व समारोप, सन्मान सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. ग्रामीणस्तरावरील शाळकरी मुलांमध्ये साहित्य चळवळ रुजावी, या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. न्यायालय प्रक्रिया व आजची वास्तववादी जीवन प्रणाली यावरील प्रश्न व समस्या मुलांना समजावेत, दृष्टीने बाल संसद भरविण्यात येत आहे. सहभागी मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या बाल साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसाप तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, तालुका सचिव प्रतिभा चव्हाण, सरपंच मीलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे आदींनी केले आहे.