चिपळूण ः मिरजोळी येथे उद्या साईबाबा भंडारा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः मिरजोळी येथे उद्या साईबाबा भंडारा सोहळा
चिपळूण ः मिरजोळी येथे उद्या साईबाबा भंडारा सोहळा

चिपळूण ः मिरजोळी येथे उद्या साईबाबा भंडारा सोहळा

sakal_logo
By

मिरजोळीत उद्या
साईबाबा भंडारा सोहळा
चिपळूण, ता. २ ः श्री साईबाबा मंडळ मिरजोळी ग्रामस्थ यांच्या वतीने बुधवारी (ता. ४) साईभंडारा उत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्त विविध कार्यक्रम होणार असून साईभक्तांनी या उत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा मंडळाने केले आहे. ४ जानेवारीला सकाळी ९ वाजता अभिषेक, १० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १ ते ३ वा. साईभंडारा होणार आहे. सायं. ७.३० ते ८.३० वा. श्री साई तरुण मित्रमंडळ कोंढे मधलीवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम आहे. रात्री ९ ते १० वा. भोरजेवाडी मित्रमंडळ मिरजोळी यांचे भजन तर रात्री १० वा. आई वाघजाई कलामंच नांदगाव यांचे गणपतीदर्शन गण गवळण धेनुकासुराचा वध खास आकर्षण स्त्रीपात्रांनी नटलेली नटखट गवळण, हृदयस्पर्शी काल्पनिक चित्तथरारक वगनाट्य ''हात भिजले रक्ताने'' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.