
बांदा नाबर शाळेला साहित्य
72689
बांदाः नाबर शाळेत एमएसएफसी विभागाला प्रात्यक्षिक साहित्य प्रदान करताना अश्विनी अशोक. (छायाचित्र : नीलेश मोरजकर)
बांदा नाबर शाळेला साहित्य
बांदा : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशाळेच्या एमएसएफसी विभागाला प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून उपलब्ध करून दिले. बँकेच्या अधिकारी अश्विनी अशोक यांच्या हस्ते हे साहित्य नुकतेच प्रदान करण्यात आले. यामध्ये सी कटर, ग्राफ्टिंग कटर, डिजिटल बीपी किट, वॅट मीटर, व्होल्ट मीटर या प्रात्यक्षिक साहित्य खरेदीसाठी आवश्यक निधी देण्यात आला. यासाठी बँकेचे मॅनेजर अंकीत धवन यांनी सहकार्य केले. दहावीमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक साहित्य शाळेला भेट देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका मनाली देसाई, विभागप्रमुख रिना मोरजकर, एम. एस. एफ. सी. विभागाचे समन्वयक राकेश परब, निदेशक भिकाजी गिरप, निदेशिका रिया देसाई, गायत्री देसाई आदी उपस्थित होते.