शालेय खेळ खिलाडूवृत्तीचे उगमस्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय खेळ खिलाडूवृत्तीचे उगमस्थान
शालेय खेळ खिलाडूवृत्तीचे उगमस्थान

शालेय खेळ खिलाडूवृत्तीचे उगमस्थान

sakal_logo
By

72895
कुडाळ ः बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे फुगे सोडून उद्‍घाटन करताना मेजर दिनेश गेडाम. शेजारी सुरजीत सिंग, प्रा. अरुण मर्गज आदी.


शालेय खेळ खिलाडूवृत्तीचे उगमस्थान

दिनेश गेडाम ः कुडाळमध्ये क्रीडा स्पर्धांचे उद्‍घाटन

कुडाळ, ता. ३ ः मैदानी खेळ हे जसे शरीराला तंदुरुस्त बनवतात, तसेच ते मनालाही शक्तिवर्धक असतात. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण करण्याचे काम विविध क्रीडा प्रकारांमुळे होते. म्हणूनच विद्यार्थी दशेत खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे विचार ५८ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी मांडले.
बॅ. नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अॅकॅडमी कुडाळ आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या उद्‍घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी खेळाचे महत्त्व व त्याचे आपल्याला होणारे फायदे याबाबत उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. खिलाडूवृत्ती ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्त्वाची असून विविध क्रीडा प्रकार हे तिचे उगमस्थान आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरजीत सिंग, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, प्राध्यापिका वैशाली कोलगावकर, बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. सूरज शुक्ला, बॅ. नाथ पै बी.एड कॉलेज प्राचार्य परेश धावडे, बॅ. नाथ पै सीनियर कॉलेज प्राचार्य अरुण मर्गज तसेच नंदिनी देशमुख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून एनसीसी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘मार्च पास’चे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करून या क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ केला. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो, लांब उडी, गोळा फेक, हॉलीबॉल, थ्रो बॉल, १०० मीटर धावणे, रिले, कॅरम, बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले. नर्सिंग प्राध्यापिका गौतमी माईंडकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बॅ. नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अॅकेडमी, कुडाळच्या प्राध्यापिका वैशाली ओटवणेकर, क्रीडा विभाग प्रमुख वैजयंती नर, प्रा. प्रथमेश हरमलकर, प्रसाद कानडे, शांभवी आजगावकर-मार्गी, सुमन करंगळे-सावंत, प्रणाली मयेकर, पूजा म्हालटकर, प्रियांका माळकर, रेश्मा कोचरेकर, ऋग्वेदा राऊळ, कृतिका यादव उपस्थित होत्या.