मालवणमधील शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणमधील शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा
मालवणमधील शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा

मालवणमधील शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा

sakal_logo
By

swt३१२.jpg
72897
मालवण : औरंगाबाद सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला निघालेले मालवण तालुक्यातील शेतकरी तसेच अधिकारी वर्ग.

मालवणमधील शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा
४५ जणांचा सहभागः कृषी प्रदर्शनासाठी औरंगाबादला रवाना
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण व कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना (यूएनडीपी-जीसीएफ) अंतर्गत शेतकरी अभ्यास दौरा औरंगाबाद सिल्लोड येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण येथून काल (ता. २) तालुक्यातील शेतकरी या अभ्यास दौऱ्यासाठी खासगी वाहनाने रवाना झाले.
हा अभ्यास दौरा २ ते ५ जानेवारी असा चार दिवसांचा नियोजित आहे. यामध्ये औरंगाबाद सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहणे, राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत विविध उपक्रमांची पाहणी व माहिती घेणे, प्रगत शेतकऱ्यांना भेटी देत सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती घेणे असा अभ्यास केला जाणार आहे. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये बहुसंख्येने विविध प्रकारचे स्टॉल उभारणे, विविध प्रकारची प्रात्यक्षिके, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग, शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच विविध विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यांचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा, ह्या उद्देशाने शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. यामध्ये तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी कार्यालय मालवण यांच्या वतीने केले असून एनडीपी-जीसीएफ यांच्या अर्थ साह्याने आयोजित केला आहे. दौऱ्यामध्ये बदनापूर कडधान्य संशोधन केंद्र येथील विविध उपक्रमांची माहिती घेणे, परतीच्या प्रवासात कोल्हापूर कनेरी मठ येथील सेंद्रिय शेती उपक्रमाची माहिती घेणे अशा विविध उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांना या दौऱ्यात होणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी यांनी दिली.