
सावंतवाडीत राष्ट्रवादीतर्फे सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
72916
सावंतवाडी ः येथील समाज मंदिर हॉल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करताना राष्ट्रवादी पदाधिकारी व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी.
सावंतवाडीत राष्ट्रवादीतर्फे
सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
सावंतवाडी ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर हॉल येथे सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अॅड. कांबळी, पत्रकार मोहन जाधव, सगुण जाधव आदी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, राकेश नेवगी, सावली पाटकर, अॅड. एस. व्ही. कांबळी, अरबी चौकेकर, एम. बी. कदम, सगुण जाधव, पाटणकर मॅडम, निगुडकर मॅडम, प्रवीण कांबळे, विनय वाडकर, संगीता मधुरकर आदी उपस्थित होते.
--
72915
सावंतवाडी ः शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना महिला पदाधिकारी.
सावित्रीबाई फुलेंना सावंतवाडीत वंदन
सावंतवाडी ः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी वंदन करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’चे शहर प्रमुख भारती मोरे, जिल्हा संघटक अॅड. नीता कविटकर, लतिका सिंग, शिवानी पाटकर, शितल कवठणकर, सत्वशीला कुपवडेकर, माधुरी वाडकर, शैलजा पारकर, चेतना वाडकर, गीता सुकी, अनारोजिन लोबो, पूजा नाईक, सायली होडावडेकर, राजश्री ठाकूर, मिताली गावडे, मधुरा गावडे आदी उपस्थित होत्या.