ज्येष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत युवराज सिंग संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत युवराज सिंग संघ विजेता
ज्येष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत युवराज सिंग संघ विजेता

ज्येष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत युवराज सिंग संघ विजेता

sakal_logo
By

swt330.jpg
72961
मालवणः विजेत्या युवराज सिंग संघास चषक व पारितोषिक देऊन गौरविताना मान्यवर.

ज्येष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत
युवराज सिंग संघ विजेता
मालवणची स्पर्धाः ९ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी टेनिस क्रिकेट क्लब व मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने येथील बोर्डिंग मैदानावर आयोजित जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील खेळाडूंच्या सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेत अनिल हळदीवे यांचा युवराज सिंग संघ विजेता ठरला. या संघाने संदीप साटम-सुधीर साटम यांच्या हरभजन सिंग संघावर १० गडी राखून मात केली. स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला.
विजेत्यांना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदीवे, उपाध्यक्ष काका कुडाळकर, बाबली वायंगणकर, दिलीप वर्णे, राजन नाईक, सुनील धुरी, विजय जोईल, बबन परब, रिझवान शेख, सुधीर साटम, शरद शिरोडकर, पपू परब, नितीन वाळके, असोसिएशनचे पदाधिकारी, क्रीडारसिक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा शुभारंभ उद्योजक तथा मालवणी कवी बाबला पिंटो यांच्या हस्ते करण्यात आला. मालिकावीर संतोष मडगावकर, उत्कृष्ट फलंदाज संजू फर्नांडिस, गोलंदाज दर्शन नार्वेकर, यष्टीरक्षक रिझवान शेख, क्षेत्ररक्षक अनिल हळदीवे तसेच अंतिम सामनावीर किरण परब यांना गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू हळदीवे, पपू परब, बबन परब, आनंद आळवे, बाबली वायंगणकर यांचा तसेच राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या टोपीवाला हायस्कूलच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाचा सत्कार केला.