चिपळूण ः भिलेच्या सरपंचपदी आदिती गुडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  भिलेच्या सरपंचपदी आदिती गुडेकर
चिपळूण ः भिलेच्या सरपंचपदी आदिती गुडेकर

चिपळूण ः भिलेच्या सरपंचपदी आदिती गुडेकर

sakal_logo
By

फोटो - ratchl38.jpg ः KOP23L72929 चिपळूण ः पदग्रहण सोहळाप्रसंगी सरपंच, उपसरपंच व सदस्य.

भिलेच्या सरपंचपदी आदिती गुडेकर

उपसरपंचपदी उमेश सकपाळ विराजमान
चिपळूण, ता. ३ ः तालुक्यातील भिले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आदिती गुडेकर व उपसरपंचपदी उमेश सकपाळ नुकतेच विराजमान झाले आहेत. सरपंच व उपसरपंच यांच्यासह सदस्यांना येथील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या. गावाच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेत प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंच आदिती गुडेकर यांनी दिली.
तालुक्यातील भिले ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी निवडणूक झाली होती. सरपंचपदाच्या निवडणुकीत गुडेकर विजयी झाल्या होत्या. एकाच वाडीतील दोन उमेदवार एकमेकांविरोधात लढले होते तर सदस्य बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये उमेश सकपाळ, विद्या सकपाळ, श्रावणी गुरव, श्यामल निगडे, सुनील सुतार, मंगेश भुवड या सदस्यांचा समावेश आहे. २९ डिसेंबरला उपसरपंचपदाची निवडणूक झाली. उपसरपंचपदासाठी उमेश सकपाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. याच दिवशी सरपंचपदी आदिती गुडेकर यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. नवनिर्वाचित सरपंच गुडेकर यांनी आपल्या मनोगतात गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. गावात विविध शासकीय योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जातील. गावातील सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेत पारदर्शकपणे कारभार केला जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी माजी सरपंच धनंजय केतकर, सुभाष गुडेकर, सोमा गुडेकर, सुरेश गुडेकर, दत्ताराम गुडेकर, शीतल गुडेकर, विश्वास सकपाळ, गौतम सकपाळ, काळूराम सकपाळ, रवी सुतार, गजानन भुवड आदी उपस्थित होते.