खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक

खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक

Published on

rat३२२.txt

( पान ५ संक्षिप्त)


कंपोस्ट खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक

खेड ः दापोलीमध्ये विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेअंतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, दापोली येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी अझोला निर्मिती आणि कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दिले. या वेळी येथील शेतकरी अजित नाईक, महेश परब, सदानंद भगत, कृषिमित्र गटातील विद्यार्थी सतीश वाघमारे, सिद्धांत ओव्हाळ, विशाल सरुळे आदी उपस्थित होते. हे सर्व प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. जी. देसाई, वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद जोशी, रोगशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. राजेश राठोड, पशु व दुग्धशास्र विषय विशेषज्ञ डॉ. एन. प्रसादे, कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे सहसंचालक डॉ. व्ही. जी. नाईक तसेच फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला विभागाचे एइएस डॉ. एम. सणस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
---
२० जानेवारीला नेत्रदान शिबिर

राजापूर ः अमोल रंगयात्री लांजा व मंगलमूर्ती फाउंडेशन पाली यांच्यातर्फे २० जानेवारीला नेत्रदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान लांजा, रत्नागिरी व राजापूर येथून शंभर फॉर्म भरण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ज्या कोणाला नेत्रदान करण्याची इच्छा असेल त्यांनी फॉर्म भरून जयूशेठ पाखरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---

खंडाळा इंग्लिश स्कूलमध्ये फूड फेस्टिव्हल

जाकादेवी ः रत्नागिरी तालुक्यातील ग्रामविकास मंडळ वाटद मिरवणे संचलित खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलचे उद्घाटन पद्माकर सावंत यांच्या हस्ते झाले. यासाठी ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले होते. पालकांनी या फूड फेस्टिवलला भरभरून प्रतिसाद दिला तसेच विद्यार्थ्यांनीही या फेस्टिव्हलचा मनमुराद आनंद घेतला. या फेस्टिव्हलला संस्थापक अध्यक्ष विष्णूदत्त निमकर, प्रकाश कारखानीस, अवधूत काळे व इतर पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक आशिष वासावे, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी हे फेस्टिव्हल यशस्वी होण्यासाठी मुलांना मार्गदर्शन केले.
--
वेरळ येथे विज्ञान प्रदर्शन

खेड ः श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वेरळ येथे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तळे हायस्कूलचे मुख्याध्यापक पोपट जगताप, एल. पी. इंग्लिश मीडियम स्कूलचे सहाय्यक शिक्षक माळी, नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी हायस्कूलच्या सहशिक्षिका स्मिता तिवारी, शिक्षक पालक संघटना सदस्य गणेश जाधव उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार केला होत्या. यामध्ये टाकाऊतून टिकाऊ, वेळेची बचत, नैसर्गिक शेतीप्रगत तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर आपले कौशल्य व आवड दाखवून उत्स्फूर्त सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे उद्याच्या युगातील वैज्ञानिक निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक गोष्टींची जाणीव करून देणे हा असतो. म्हणूनच या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला. परीक्षकांनी व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा उत्साह वाढवला.
--

rat३p२०.jpg ः
७२९२७
राजापूर ः राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित.

ग्राहकांनी आपली भूमिका बजावावी

राजापूर ः प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. आपण अभ्यासपूर्वक व डोळसपणे ग्राहक म्हणून आपली भूमिका बजावली पाहिजे म्हणजे फसण्याचे प्रकार कमी होतील. पर्यायाने आपले नुकसान होणार नाही. ग्राहकांनी सजग राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी केले. राजापूर तहसीलदार कार्यालयाद्वारे नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगर पालिकेच्या नाथ पै सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये पंडित यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सेवानिवृत्त प्राध्यापक जी. आर. कुलकर्णी, ग्राहकमंचाचे तालुकाध्यक्ष विजय कुबडे, राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक सुलतान ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कुलकर्णी यांनी शैक्षणिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रामध्ये नेमकी कशाप्रकारे फसवणूक होते हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी ग्राहकमंच प्रभावीपणे काम करण्यासाठी संघटित राहणे आवश्यक असल्याचे मतही मांडले.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com