
बसवर दगडफेक
rat०३२४.txt
( पान ५ वा ३)
चिपळूण-खेर्डी बसगाडीवर अज्ञाताकडून दगडफेक
चिपळूण ः चिपळूण आगाराच्या खेर्डी बसगाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना ३१ डिसेंबरला घडली आहे. या प्रकारात बसच्या मागील काचा फुटल्या आहेत. याबाबत लोटे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. चिपळूण आगाराची बस रात्री औद्योगिक क्षेत्राकडे जाते. ही बस ३१ डिसेंबरला गोंदे परिसरात आली असता अज्ञात व्यक्तींनी बसगाडीच्या मागील काचावर दगडफेक केली. त्यात काचा फुटल्याने नुकसान झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
--
महिलांकडून वाशिष्ठी नदीला साडी अर्पण
चिपळूण ः चिपळूणमध्ये चला जाणूया नदीला अभियानाला सुरवात झाली आहे. नदीचे महत्व पटवून देत असतानाच नदीशी आपलं आगळवेगळ नातं आहे याची जाणीव ठेवत चिपळूणमधील महिलांनी वाशिष्ठी नदीला साडी अर्पण केली. नदीचे महत्व जाणून घेऊन नदीचा अभ्यास करण्यासाठी चला जाणूया नदीला हा शासकीय उपक्रम आहे. या उपक्रमात चिपळूणमधील महिलांचाही लक्षवेधी सहभाग आहे. पुढील काही महिने नद्यांचा अभ्यास केला जाऊन याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.
--
थंडीची चाहूल गुहागर गारठले
गुहागर ः उत्तरेकडील शीतलहरींनी कोकण भागातील तापमान खाली आलेला पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गारठा निर्माण झाला आहे. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून ते कडाक्याची थंडी भरेपर्यंत जानेवारी महिना गारठण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुहागरमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी सुरू झाली आहे. नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे.
''गणिताशी मैत्री'' प्रज्ञा नरवणकर यांचे मार्गदर्शन
चिपळूण ः पाचवीतील विद्यार्थ्यांना गणिताशी मैत्री कशी करावी याचा वस्तुपाठ माजी प्राथमिक मुख्याध्यापिका प्रज्ञा नरवणकर यांनी अलोरे हायस्कूलच्या विद्यार्थ्याना दिला. त्यांनी प्रामुख्याने शिष्यवृत्ती परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. मूळ आणि संयुक्त संख्या या विषयाचा पाठ त्यांनी घेतला. छोट्या छोट्या प्रश्नातून त्यांनी या स्पर्धा परीक्षेतील गमतीजमती सांगितल्या. मुलांना काही प्रश्न घातले आणि ते सोडवून दिले. मुलांना त्या काळी पाटीवर रेषा काढून दिल्या जायच्या, अशी आठवण त्यांनी सांगितली. दोन संख्यांमध्ये स्वल्पविराम का असला पाहिजे हे त्यांनी पटवून दिले. मूळ संख्या कोणत्या, २१ ते ३० दरम्यान मूळ संख्या किती, दरम्यान म्हणजे काय, अगदी छोटे छोटे शब्द आणि त्यांचे अर्थ त्यांनी स्पष्ट केले.
--
नाविक क्षेत्रात असंख्य संधी
चिपळूण ः अलोरे येथील माजी शिक्षिका चारूशिला मुकुंद जोशी स्मृतिविचार मंचावर मरीनर दिलीप भाटकर यांनी अकरावी-बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नाविक क्षेत्रात असंख्य संधी आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. मुले आणि मुलींनीही या क्षेत्रात आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आपला जीवनप्रवास, भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून कोकणासाठीच आपण का आणि कसे आलो, विविध परीक्षा, समुद्रातील आव्हाने याविषयी त्यांनी उत्तम माहिती दिली. नाविक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी अवश्य वळले पाहिजे, अशी कळकळ त्यांनी व्यक्त केली.
--
rat३p२४.jpg ः
७२९८३
प्रवीण शिंदे
प्रवीण शिंदे यांना युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर
साखरपा ः संगमेश्वर तालुका प्रेस क्लबच्या साखरपा विभागाच्यावतीने दिला जाणारा युवा प्रेरणा पुरस्कार पुर्ये गावाच्या प्रवीण शिंदे यांना जाहीर झाला आहे. विभागातर्फे नुकतेच हे जाहीर करण्यात आले आहे. कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कोरोनाच्या प्रत्येक लाटेत सामाजिक भान राखत गावात काम केले होते. गावात येणाऱ्या चाकरमान्यांची सोय केली होती. विलगीकरण करण्यात आलेल्या चाकरमान्यांच्या आरोग्याची सोय केली होती तसेच विलगीकरण केंद्रातही सेवा दिली होती. त्यांच्या या कामाची दखल तहसीलदार यांनी घेऊन त्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव केला होता. शिंदे यांची निवड यंदाच्या युवा प्रेरणा पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुका प्रेस क्लबच्या साखरपा विभागाच्यावतीने गेल्या वर्षीपासून पंचक्रोशीत उत्कृष्ट काम करणाऱ्या एका युवकाला हा पुरस्कार देण्यात येतो. येत्या पत्रकार दिनी हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.