चिपळूण - चिपळूण अर्बनची निवडणूक अखेर बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - चिपळूण अर्बनची निवडणूक अखेर बिनविरोध
चिपळूण - चिपळूण अर्बनची निवडणूक अखेर बिनविरोध

चिपळूण - चिपळूण अर्बनची निवडणूक अखेर बिनविरोध

sakal_logo
By

चिपळूण अर्बनची निवडणूक अखेर बिनविरोध
पाच नव्या चेहऱ्यांना संधी ; इतर इच्छुकांचा विचार पाच वर्षानंतर
चिपळूण, ता. 3 ः चिपळूण अर्बन बँकची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. पंधरा जागांमध्ये पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तसेच जे बॅंकेत जाण्यासाठी हट्ट धरून होते. त्यांचा पाच वर्षानंतर विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली.
चिपळूणमधील सर्वात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून चिपळूण अर्बन बँकेची ओळख आहे. बॅंकेत संचालकपदाच्या १५ जागा आहेत. संचालक म्हणून जाण्यासाठी ३९ जण इच्छुक होते. इच्छुकांनी माघार घेतली नाही तर निवडणूक अटळ मानली जात होती. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. बॅंकेचे माजी संचालक सुचय रेडीज, माजी अध्यक्ष संजय रेडीज, उमेश काटकर यांनी इच्छुकांची मनधरणी करून अनेकांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. इच्छुकांपैकी पाच नवीन चेहरे घेण्यात आले आहेत तसेच संचालक म्हणून या वेळी जाण्यास इच्छुक होते. त्यांचा पाच वर्षानंतर विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
माजी संचालकांपैकी अनिल दाभोळकर, राजन कुडाळकर, मंगेश तांबे, दिलीप दळी, सतीश खेडेकर या पाच सदस्यांना विश्रांती देण्यात आली आहे. विनायक सावंत, प्रवीण तांबट, खालिद दाभोळकर, शालिग्राम विखारे, विजयकुमार रतावा, नंदकुमार चिटणीस, पंकज बिर्जे, महेश कोळवणकर, गोविंद खरे, विलास चिपळूणकर, सूर्यकांत चिपळूणकर यांनी विविध जागांवर दाखल केलेले अर्ज आज मागे घेतले. त्यामुळे बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वसाधारण मतदार संघातून राजेश केळसर, मिलिंद कापडी, रत्नदीप देवळेकर, समीर टाकळे, सुनील खेडेकर या पाच सदस्यांना नव्याने संधी मिळाली. निहार गुढेकर, रहिमान दलवाई, मोहन मिरगल, संजय रेडीज हे सदस्य कायम आहेत. तालुकाबाहेरील शाखावर्गातून धनंजय खातू यांना संधी देण्यात आली. महिलावर्गातून राधिका पाथरे आणि गौरी रेळेकर यांना पुन्हा संधी मिळाली आहे. अनुसूचित जाती-जमाती वर्गातून समीर जानवलकर यांना संधी मिळाली आहे. इतर मागास वर्गातून प्रशांत शिरगावकर आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातून नीलेश भुरण यांना पुन्हा संधी मिळाली आहे.