झाडे तोडून जमिनीची धूप होत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडे तोडून जमिनीची धूप होत नाही
झाडे तोडून जमिनीची धूप होत नाही

झाडे तोडून जमिनीची धूप होत नाही

sakal_logo
By

rat०३३८.txt

( पान ५ मेन )

झाडे तोडून जमिनीची धूप हा दावाच खोटा

भास्कर जाधव ; झाड मुळासकट तोडले जात नाही

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ३ ः चिपळूण शहर व परिसरात २२ जुलै २०२१ ला आलेल्या महापुरानंतर नद्यांतील गाळासह जंगलतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पर्यावरण अभ्यासकांनी सातत्याने वृक्षतोडीवर आवाज उठवला. आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचा हा दावाच खोडून काढला. चिपळुणात निघालेल्या नदीयात्रेनंतरच्या सभेत झाड तोडताना ते मुळासकट तोडले जात नाही. त्यामुळे जमिनीची धूप होईलच कशी असा सवाल आमदार जाधव यांनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाच्यावतीने चला जाणूया नदीला हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी सोमवारी (ता. २) शहरातीन नदीयात्रा काढण्यात आली. या निमित्ताने पेठमाप येथे सभा झाली. या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी जंगलतोडीवर भाष्य केले. प्रामुख्याने महापुरानंतर गाळाने भरलेल्या नद्या आणि सह्याद्री पर्वतरांगातील बेसुमार वृक्षतोडीचा मुद्दा प्रामुख्याने पुढे आला. सह्याद्रीच्या पट्ट्यातील जंगलतोडीमुळे जमिनीची धूप होऊन नद्या गाळाने भरत असल्याने जंगलतोडीवर बंदी घालण्याबाबत विविध सामाजिक संस्था, वनअभ्यासक या विषयातील तज्ञ सातत्याने शासनदरबारी मागणी करत आहेत. महापुरानंतर गतवर्षी गाळ उपसासाठी महिनाभर चिपळूण बचाव समितीने आमरण उपोषण केले. त्या वेळीही नागरिकांच्या मागण्यांमध्येही जंगतोडीवरील बंदीचा मुद्दा गाजला होता. अशातच सोमवारी आमदार जाधव यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
सभेत अभियानचे समन्वयक शाहनवाज शाह यांनी आपल्या प्रास्ताविकात बेसुमार होत असलेल्या जंगलतोडीवर बंदी आणली नाही तर नद्या गाळाने भरून जाऊन मोठा बिकट प्रश्न निर्माण होणार असल्याचे नमूद केले होते. त्यांच्या वक्तव्याचा धागा पकडत आमदार जाधव यांनी जंगलतोडीबाबत भाष्य करताना झाडतोडीमुळे जमिनीची धूप होते हा दावा खोडून काढला. कोकणात जंगलतोडीमुळे जमिनीची धूप होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुळात कोकणात जंगलतोड करताना झाड मुळासकट तोडले जात नाही. त्यामुळे धूप होईल कशी? असा उलट प्रश्न करत जंगल तोडायला आपले समर्थन नाही; पण जंगलतोडीमुळे जमिनीची धूप होत नाही. कोकणात एक झाड तोडले तर त्याला दहा-बारा फुटवे येतात. त्यामुळे जंगल आणखीनच वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वणवे रोखण्यासाठी नवीन कायद्याची गरज
कोकणातील जंगलात वणवे लावण्याच्या घाणेरड्या प्रवृत्ती रोखण्यासाठी नवीन कायदा करण्याची गरज असून जंगले नष्ट करण्यामागे वणवेदेखील जबाबदार आहेत. मंत्रिपदाच्या काळात मी यासाठी अनेक प्रयत्न केले. वणवा या विषयावर परिणामकारक निर्णय घेता आला नसल्याची खंतदेखील आमदार जाधव यांनी व्यक्त केली.