शेर्लेत उद्या जत्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेर्लेत उद्या 
जत्रोत्सव
शेर्लेत उद्या जत्रोत्सव

शेर्लेत उद्या जत्रोत्सव

sakal_logo
By

73058
शेर्ले रवळनाथ

शेर्लेत उद्या
जत्रोत्सव
बांदा ः शेर्ले येथील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी (ता. ६) साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक झाल्यानंतर ‘श्री’ दर्शनास सुरुवात होणार आहे. देवास केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे हे कार्यक्रम होतील. रात्री सवाद्य पालखी प्रदक्षिणा, भाविकांची लोटांगणे, मध्यरात्री कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सवाला मुंबई, पुणे, गोव्यासह जिल्हाभरातील भाविक दाखल होणार आहेत. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती व शेर्लेवासीयांनी केले आहे.
----
जागेच्या वादातून
विक्रेत्यांत हाणामारी
सावंतवाडी ः येथील आठवडा बाजारात पालिकेच्या समोरील पदपाथवर दोघा भाजी व्यापाऱ्यांमध्ये काल (ता. ४) सायंकाळी चारच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. भाजी लावण्यासाठी जागा मिळावी, यासाठी दोघांनी शाब्दिक बाचाबाची करत मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे सावंतवाडी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. वाहतूक पोलिस राजा राणे यांनी ही कारवाई केली. आठवडा बाजाराला मोती तलावाच्या काठी होणाऱ्या गर्दीमुळे येथे येणाऱ्या भाजी विक्रेत्यांमध्ये आपापली दुकाने थाटण्याच्या प्रयत्नात अशा घटना वारंवार घडत असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
--
‘डीपीडीसी’ सभा
पुढे ढकलली
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) उद्या (ता. ५) होणारी सभा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली असून आगामी सभेची तारीख कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कळविले आहे. ‘डीपीडीसी’ची सभा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथील समितीच्या सभागृहात आयोजित केली होती.
--
मिठबावमध्ये
नृत्य स्पर्धा
देवगड ः मिठबाव (ता.देवगड) व्यापारी मित्रमंडळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त २३ जानेवारीला रात्री साडेनऊला मिठबाव बाजारपेठ येथे खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. पहिल्या चार विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ६६६६, ५५५५, ४४४४, ३३३३ रुपये रोख तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थसाठी अनुक्रमे २०२२ व ११११ रुपयांची दोन पारितोषिके आहेत. विनोद (भाई) लोके, अनया जेठे यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.