सावंतवाडी-भटवाडी येथून शिक्षक बेपप्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी-भटवाडी
येथून शिक्षक बेपप्ता
सावंतवाडी-भटवाडी येथून शिक्षक बेपप्ता

सावंतवाडी-भटवाडी येथून शिक्षक बेपप्ता

sakal_logo
By

सावंतवाडी-भटवाडी
येथून शिक्षक बेपप्ता
सावंतवाडी, ता. ३ ः सावंतवाडी-भटवाडी येथील शिक्षक बेपत्ता झाले आहेत. राजेश शशिकांत पाटकर (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी रेश्मी पाटकर यांनी काल (ता.२) रात्री येथील पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची खबर दिली. त्यानुसार बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की ः पाटकर हे कलंबिस्त येथे इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आहेत. ते नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळेत जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले; मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. त्यांचा कुठेही शोध लागला नसल्याने त्यांनी याबाबतची खबर येथील पोलिस ठाण्यात दिली. येथील पोलिस अधिक तपास करत आहेत.