प्रकल्प संचालकपदी यू.ए.पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्प संचालकपदी यू.ए.पाटील
प्रकल्प संचालकपदी यू.ए.पाटील

प्रकल्प संचालकपदी यू.ए.पाटील

sakal_logo
By

प्रकल्प संचालकपदी यू.ए.पाटील
ओरोस ः सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या रिक्त असलेल्या प्रकल्प संचालक पदावर शासनाने यू. ए. पाटील यांची नियुक्ती केली आहे. पाटील हे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात चौकशी विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. दीपक चव्हाण यांची बदली झाल्यानंतर गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रकल्प संचालक हे पद रिक्त आहे. त्याचा अतिरिक्त कारभार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे होता. पराडकर हे हा कारभार चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. आता पाटील यांची नियुक्ती झाल्याने कायमस्वरुपी अधिकारी प्राप्त होणार आहे. शुक्रवारी (ता. ६) पाटील हे हजर होणार असल्याचे समजते. दरम्यान, अन्य नियुक्तीत जिल्हा परिषदेत यापूर्वी ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कमलाकर रणदिवे यांना पदोन्नती मिळाली असून भंडारा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सध्या ते पुणे जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
--
73151
गजानन रेवडेकर

गजानन रेवडेकरांना ‘समाजसेवा’
तळेरे ः एकता कल्चरल अकादमी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय एकता पुरस्कारासाठी नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन रेवडेकर यांची निवड अकादमीच्या निवड समितीने केली. याबद्दल रेवडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रेवडेकर यांनी नांदगाव विकास मंडळ, हरिओम् ट्रस्ट, सहकार शिक्षण संस्था, पारशीवाडी मित्र मंडळ, स्वामी समर्थ कट्टा आर्थररोड, श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसर भाडेकरू संघ, देवगिरी रहिवाशी संघ, अदाणी स्थानीय लोकाधिकार समिती, बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, केवल्य सेवा मंडळ आणि विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आदी नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय, क्रीडा-कला, धार्मिक क्षेत्रात योगदान दिले आहे. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ समाजसेवेतील वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल रेवडेकर यांची निवड झाली.