
फोटोसंक्षिप्त-तंजावरच्या महाराजांची ''कला आंगण''ला भेट
७३१५९
तंजावरच्या महाराजांची ‘कला आंगण’ला भेट
कुडाळ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील तंजावर राज्याचे महाराज बाबाजी राजे यांनी पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरीला राजे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ठाकर लोककलेच्या या ऐतिहासिक ठेव्याचे छत्रपतींनी कौतुक केले. तंजावरमध्ये सुद्धा मराठी लोक आहेत आणि आम्ही घरी शुद्ध मराठीच बोलतो, असे त्यांनी आवर्जून सांगत तंजावर आणि महाराष्ट्राचा इतिहास सांगितला. पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या या उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढून त्यांचे अभिनंदन केले. गंगावणे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजी राजे यांनी तमिळनाडूमध्ये तंजावर राज्याची स्थापना केली होती.
७३१६०
माणगाव ग्रामपंचायतीस
आमदार नाईकांची भेट
कुडाळ ः आमदार वैभव नाईक यांनी आज माणगाव ग्रामपंचायत येथे भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आमदार नाईक यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजासह विकासकामांचा आढावा घेत सरपंच, उपसरपंचांना मार्गदर्शन केले. यावेळी माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, रमाकांत ताम्हणेकर, बंड्या कुडतरकर, कौशल जोशी, दीपक आंगणे, संदीप सावंत, स्वप्नील शिंदे, अवधूत गायचोर, बंटी भिसे, एकनाथ धुरी, बच्चू नाईक आदी उपस्थित होते.