जाधव ॲकेडमीचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाधव ॲकेडमीचे यश
जाधव ॲकेडमीचे यश

जाधव ॲकेडमीचे यश

sakal_logo
By

rat०४२४. txt

(टुडे पान ४ साठी, संक्षिप्त)

फोटो ओली
rat३p२.jpg ः
७३१७९
रत्नागिरी ः महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत दिया आंबेकरने प्रथम क्रमांक पटकावला.
-----
जाधव फिटेनेस अॅकॅडमीचा वर्धापन दिन

रत्नागिरी ः येथील जाधव फिटनेस अॅकॅडमीचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात झाला. यानिमित्त घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये निखिल नलावडे यांनी मराठा श्रीचा किताब पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अण्णा सामंत व मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष केशवराव इंदुलकर यांच्या हस्ते झाले. अॅकॅडमीने मराठा समाजाला एकत्र करून मराठा श्री शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच खुल्या गटासाठी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केली होती तसेच महिलांसाठीही स्पर्धा घेण्यात आली. अॅकॅडमीतर्फे विधवा व कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमाला मलुष्टे स्टील अॅण्ड पाइपचे मालक राजन मलुष्टे यांनी सहकार्य केले. लहान मुलांचे पॉवरलिफ्टिंगचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी पाच वर्षाच्या मुलाने १५ किलोचा डेडलिफ्ट मारला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत दिया आंबेकरने प्रथम क्रमांक पटकावला. दियाला अॅकॅडमीचे हेमंत जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. ती नॅशनल स्पर्धेसाठी जाणार आहे. सर्व स्पर्धांची शिल्ड मराठा मंडळ माळनाका यांच्यावतीने देण्यात आली. ओपन स्पर्धेचे विजेतेपद दीपक देसाई यांनी पटकावले तर अमर लटके उगवता तारा ठरला. या स्पर्धेला जीमप्रेमी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मराठा श्री किताब पटकावणारा निखिल नलावडे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच दिया आंबेकर हिचेही मान्यवरांनी कौतुक होत आहे.
---

rat३p३.jpg ः
७३१८०
काशिनाथ पाटील

मॅरेथॉन स्पर्धेत काशिनाथ पाटील यांचे यश

रत्नागिरी ः आयएम फिट क्लब इचलकरंजी आयोजित ४६ ते ६० वर्षे वयोगटातील नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत येथील फिनोलेक्स इंजिनिअरिंग लि. कंपनीचे कर्मचारी काशिनाथ पाटील यांनी १० किलोमिटर अंतर ४५ मिनिटात पार करून यश मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल फिनोलेक्स मॅनेजमेंटतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
---

rat३p४.jpg ः
७३१८१
रत्नागिरी ः (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे १२ वर्षाखालील खेळाडू.

छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी उपांत्य फेरीत प्रवेश

रत्नागिरी ः राष्ट्रप्रेम क्रिकेट अॅकॅडमी कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित केलेल्या १२ वर्षाखालील वेस्ट झोन लिग क्रिकेट स्पर्धेत येथील (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने पाचपैकी तीन सामन्यात निर्विवादपणे विजय मिळवून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ही स्पर्धा डॉ. इम्रान पटेल यांच्या वडगाव कोल्हापूर येथील राष्ट्रप्रेम क्रिकेट मैदानावर सुरू असून स्पर्धेत १० संघ सहभागी झाले आहेत. (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने प्रथम एमजी स्पोर्टस क्लब गांधीनगर यांना हरवून त्यानंतर झालेल्या सामन्यात ओम अॅकॅडमी कोल्हापूर यांना हरवले. तिसऱ्या सामन्यात गडहिंग्लज क्रिकेट क्लबला हरवून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे रणवीर पाटील, तन्मय मार्कंड, गंधार पावसकर व अर्जून जोशी यांनी अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल त्यांना सामनावीर म्हणून घोषित केले. संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून राजेंद्र यादव खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक खेळाडूंच्या पालकांनीही कोल्हापूर येथे वर्णी लावली आहे.
---


rat३p११.jpg ः
७३१७८
गावतळे ः मंडळाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पत्रकार मंगेश शिंदे व इतर मान्यवर.

नवतरुण उत्कर्ष विकास मंडळाचे कार्य प्रेरणादायी

गावतळे ः दापोली तालुक्यातील नवतरुण उत्कर्ष मंडळ भागणेवाडी पांगारीतर्फे हवेली या मंडळाने गेल्या ३७ वर्षात समाजहिताचे विविध उपक्रम राबवून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला असल्याने या मंडळाचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पत्रकार मंगेश शिंदे यांनी काढले. ते दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मुलुंड विद्यामंदिर शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ग्रामीण भागात मंडळाच्या माध्यमातून अनेक जुन्या चालीरितींना आळा घातला जात असून, सामाजिक सलोखा कायम राखला जात असतो. समाजामध्ये वावरत असताना निर्माण होणाऱ्या सुख-दुःखाच्या काळात अशा मंडळाकडून खूप मोठे चांगल कार्य होत असते. त्यामुळे सामाजिक आधार व अधिकार प्राप्त होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील मंडळांचे महत्व अनन्यसाधारण असून ते अबाधित राखण्याचे कर्तव्य प्रत्येक सभासदाचे असल्याचे सांगत नवतरुण उत्कर्ष विकास मंडळाच्या पुढील वाटचालीस शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.