
तळवडे इंग्लिश मीडियममध्ये वार्षिक क्रीडादिन उत्साहात
73189
तळवडे इंग्लिश मीडियममध्ये
वार्षिक क्रीडादिन उत्साहात
सावंतवाडी ः विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच विदयार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात झाला. दोडामार्ग ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शैलेश नाईक यांनी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती सचिव खजिनदार व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य बागवे, गावडे, भोसले, तळवडे सरपंच विनिता मेस्त्री, शिक्षक पालक समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेची सुरुवात दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मैथिली नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. उपशिक्षिका मयेकर यांनी प्रास्ताविक सादर केले. शाळेतील इतर सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. क्रीडाशिक्षक वसंत सोगुलेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.